TATA Company : गाठीशी ठेवा मोठा पैसा, टाटाच्या या कंपनीत गुंतवणूक फायदेशीर ठरणार

TATA Company : टाटा कंपनीच्या या शेअरमध्ये गुंतवणूक करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी पैसा आताच गाठीशी ठेवा. कारण ही कंपनी येत्या काही दिवसांत मोठी गुंतवणूक करणार आहे.

TATA Company : गाठीशी ठेवा मोठा पैसा, टाटाच्या या कंपनीत गुंतवणूक फायदेशीर ठरणार
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 7:59 PM

नवी दिल्ली : टाटा समूहाची कंपनी टाटा स्टीलने (Tata Steel) चालू आर्थिक वर्षात, 2023-24 साठी मोठी योजना आखली आहे. ही कंपनी भारतात आणि जागतिक स्तरावर अनेक मोठ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी कंपनीने मोठ्या खर्चाची योजना आखली आहे. कंपनीने 16,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. टाटा स्टील भारतातील गुंतवणूक योजनांमध्ये 10,000 कोटी रुपये ओतणार आहे. तर 2,000 कोटी रुपये उपकंपन्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे सीईओ आणि एमडी टी व्ही नरेंद्रन आणि व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ कौशिक चटर्जी यांनी ही माहिती दिली. टाटा कंपनीच्या या शेअरमध्ये (Share) गुंतवणूक करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी पैसा आताच गाठीशी ठेवा. कारण ही कंपनी येत्या काही दिवसांत मोठी गुंतवणूक करणार आहे.

पुढील वर्षासाठी गुंतवणूक टाटा स्टील कंपनीने 2022-23 या व्यापारी वर्षाचा वार्षिक रिपोर्ट जाहीर केला आहे. पुढील व्यापारी वर्षात 2024 साठी एकूण 16,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली आहे.

कलिंगा प्लँटवर खर्च कंपनीने ओडिशा राज्यातील कलिंगा येथील प्लँटवर जास्त रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतर्गत व्यवस्थेद्वारे वर्षभर या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. 10,000 कोटींचा खर्च टाटा स्टीलच्या एकटया प्लँटवर खर्च करण्यात येणार आहे. 70% वाटा हा कलिंगा नगर प्रकल्पासाठी वापरण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

असा होईल फायदा सध्या कलिंगा येथील प्लँटची क्षमता 3 MT आहे. ती वाढून 8 MT करण्यात येणार आहे. कंपनींच्या अधिकाऱ्यांच्या मते, इतर उपकंपन्यांमध्ये विस्ताराचे वारे वाहत आहेत. काही योजना लवकरच समोर येतील. या उपकंपन्यामध्ये 2,000 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन काही उत्पादनं बाजारात येऊ शकतात.

युरोपावर लक्ष टाटा स्टील कंपनी युरोप आणि नेदरलँड येथील व्यापारवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यासाठी जवळपास 1,100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पर्यावरणासह प्रकल्पातील बदलांसाठी यातील काही रक्कम खर्च करण्यात येत आहे.

कंपनी होईल कर्जमुक्त टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे (Tata Motors Share) तिमाही निकाल लवकरच हाती येणार आहे. यावेळी कंपनी जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते. टाटा कंपनीवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. हा शेअर काही दिवसातच लांबचा पल्ला गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा होईल.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही.  कंपनीसह शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. गुंतवणूकदारांनी अभ्यास करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.