सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो, तो नेमका कुठे खर्च होतो? समजून घ्या बजेटचा ताळेबंद सोप्या शब्दात

अनेकांना सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे येतात कुठून आणि ते खर्च कसे होतात हाच मूळ प्रश्न पडला.

सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो, तो नेमका कुठे खर्च होतो? समजून घ्या बजेटचा ताळेबंद सोप्या शब्दात
आपण प्राप्तिकराची नवीन प्रणाली निवडली असेल तर आपल्याला नवीन फॉर्म भरावा लागेल. सीबीडीटीनेही हा फॉर्म अधिसूचित केलाय. या फॉर्मचे नाव 10-आईई आहे. मागील वर्षी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी विद्यमान आयकर प्रणालीपेक्षा वेगळी नवीन प्रणाली जाहीर केली. नवीन प्रणालीत कराचे दर कमी आहेत, परंतु याअंतर्गत तुम्हाला कर सूटचा लाभ मिळत नाही.
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 2:04 AM

नवी दिल्ली : नुकतंच सरकारने पुढील वर्षासाठी अर्थसंकल्प मांडलाय. यात अनेक घोषणा झाल्या. अनेक योजनांची सुरुवात करण्यात आली. वेगवेगळ्या विभागानुसार पैशांची तरतुद करण्यात आली. मात्र, अनेकांना सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे येतात कुठून आणि ते खर्च कसे होतात हाच मूळ प्रश्न पडला. हेच समजून घेण्यासाठी सरकारकडे येणारा एक रुपया आणि त्यांच्या खर्चाच्या उदाहरणातून बजेटचा हा सोपा ताळेबंद (Know all about how government get income and plan of various expenses Budget 2021).

केंद्र सरकारला खर्चाच्या आधी आपल्या उत्पन्नाचंही नियोजन करावं लागतं. त्यामुळेच आपलं उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा म्हणजेच अर्थसंकल्प होय. जर सरकारला उत्पन्न म्हणून 1 रुपया मिळाला, तर सरकार हा 1 रुपया वेगवेगळ्या विभागांमधील कामासाठी खर्च करते. या 1 रुपयापैकी 36 पैसे उधार आणि लायबलिटीजमधून येतात. महापालिका करातून 13 पैसे आणि आयकर 14 पैसे, सीमा शुल्क विभागामधून 3 पैसे उत्पन्न मिळते. दुसरीकडे केंद्रीय उत्पादन शुल्कातून 8 पैसे आणि वस्तू आणि सेवा करातून 15 पैसे मिळतात. इतर करातून 6 पैसे आणि कर्जातून 5 पैसे येतात. हे सर्व मिळून सरकारकडील एक रुपया तयार होतो.

पैसे नेमके कोठे खर्च होतात?

एकदा का सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग आणि त्याची अंदाजित रक्कम निश्चित झाली की सरकार या उत्पन्नाच्या खर्चाचंही नियोजन करतं. याप्रमाणे सरकार आपल्या पूर्वनियोजित योजनांवर 9 पैसे, केंद्राच्या योजनांवर 13 पैसे, घेतलेल्या कर्जाचं व्याज देण्यासाठी 20 पैसे आणि संरक्षण विभागासाठी 8 पैसे देतं. याशिवाय इतर देशांची मदत करण्यासाठी 9 पैसे, इतर वाहतुकीसाठी 10 पैसे, पेन्शनसाठी 16 पैसे आणि इतर खर्चासाठी 10 पैसे दिले जातात.

हेही वाचा :

टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

तुमच्याकडेही 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे? Scrappage Policy चा परिणाम काय?

आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा

व्हिडीओ पाहा :

Know all about how government get income and plan of various expenses Budget 2021

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.