Scarf Cost : मफलरचे महाभारत! मल्लिकार्जुन खरगे यांचा मफलर इन डिमांड, किंमत ऐकून डोळे पांढरे होणार

Scarf Cost : सध्या भारतीय राजकारण उद्योग विश्व आणि त्याच्या हितसंबंधाच्या अवतीभोवती फिरत आहे. हिंडनबर्ग अहवालानंतरही केंद्र सरकार अदानी समूहाला वाचवित असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. तर भाजपने ही एका मफलरचे महाभारत घडवून आणले आहे. असे काय आहे या मफलरमध्ये

Scarf Cost : मफलरचे महाभारत! मल्लिकार्जुन खरगे यांचा मफलर इन डिमांड, किंमत ऐकून डोळे पांढरे होणार
चर्चा तर होणारच
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 7:24 PM

नवी दिल्ली : अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाच्या (Adani Group) अडचणीत वाढ झाली आहे. अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. खात्यात हेराफेरी, कंपन्यांमध्ये अनियमितता, शेअरचे जादा किंमत असे गंभीर आरोप हिंडनबर्ग अहवालात करण्यात आले होते. या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरला जबरदस्त तडाखा बसला. कंपान्यांचे शेअर धडाधड खाली आहे. काही शेअर अर्ध्यावर येऊन ठेपले. 10 दिवसात कंपनीचे बाजारातील भांडवल 100 अब्ज डॉलरपर्यंत गडगडले. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. अदानी समूहाला केंद्र सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि विरोधक तुटून पडले आहेत. पण हा शिमगा सुरु असतानाच आता नवीन गोंधळ सुरु झाला आहे. एका मफलरचे हे महाभारत नेमके आहे तरी काय?

तर अदानींच्या मुद्यावर विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी ही केंद्र सरकारला याप्रकरणी धारेवर धरले. त्यांनी अदानींच्या मुद्यावरुन केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. खर्गे केंद्र सरकारवर तुटून पडलेले असतानाच सत्ताधाऱ्यांच्या नजरा त्यांच्या मफलरवर खिळल्या.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर त्यांच्या मफलरने कमाल केली. त्यांचे मफलर अचानक व्हायरल झाले. आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मफलर चर्चेत होते. पण दोन दिवसांपासून खर्गे यांचे मफलर चर्चेत आले. या चर्चेमागे या मफलरची कंपनी आणि या मफलरची किंमत हे कारण होते.

सोशल मीडियावर या मफलरच्या किंमतींची जोरदार चर्चा सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महागड्या जॅकेटवरुन अनेकदा विरोधकांनी टीका केली. त्यामुळे भाजपने खर्गे यांच्या मफलरच्या चर्चेला चांगलीच हवा दिली. यामागे या मफलरची किंमत हे कारण होते.

तर खर्गे यांच्या गळ्याची शोभा वाढविणारे मफलर लुई वीटॉन या कंपनीचे आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर या मफलरची किंमत जवळपास 56332 रुपये आहे. नेमका हाच धागा पकडून भाजपने सोशल मीडियावर खर्गे यांच्या महागड्या मफलरवर प्रश्न विचारला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी तर इतके महागडे मफलर खरेदी करण्यासाठी खर्गे यांच्याकडे पैसा आला कोठून अशा प्रकारचा सवाल केला आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी लई वीटॉन कंपनीच्या संकेतस्थळावरील स्कार्फचे फोटो शेअर केले. त्यात या मफलरच्या किंमती ही त्यांनी दिल्या आहेत. अर्थात मल्लिकार्जुन खर्गे हे काही पाहिले नेते नाहीत, ज्यांच्या कपड्यांची वा, मफलरची चर्चा झाली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूटवर जोरदार टीका झाली होती. हा सूट 10 लाख रुपयांचा असल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

लूई वीटॉन (Louis Vuitton-LV) हे एक फ्रेंच फॅशन हाऊस आहे. ही कंपनी 1854 साली स्थापन झाली आहे. तुम्हाला अनेक उत्पादनावर या कंपनीचा (LV) हा मोनोग्राम दिसेल. या कंपनीचे कपडे, कपड्याची उत्पादने, बॅग, शूज, मनगटी घड्याळ, ज्वेलरी, चष्मे बाजारात लोकप्रिय आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.