पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडलेत? मग, आता घरबसल्या मिळतील ‘या’ सुविधा!
आता पोस्ट ऑफिस देखील आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची सुविधा देत आहे. याद्वारे खातेदार घर बसल्या कोणालाही पैसे पाठवू शकतात आणि आपले खाते विवरण पाहू शकतात.
मुंबई : जर आपण पोस्ट ऑफिसमधील ‘बचत खाते’ सुविधा वापरत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण, आता पोस्ट ऑफिस देखील आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची सुविधा देत आहे. टपाल विभागाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत सांगितले की, ‘आता ग्राहक कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता भारतीय पोस्टल इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतात. ही सुविधा पैशांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारात देखील मदत करेल.’ चला तर पोस्टाच्या इंटरनेट बँकिंग बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया…( Know Details about Post office savings account internet banking facility)
भारतीय डाक इंटरनेट बैंकिंग आपको परेशानी मुक्त तरीके से धन हस्तांतरित करने में मदद करता है। इंटरनेट बैंकिंग के बारे में अधिक जानने के लिए, देखें: https://t.co/rgjJCTyyht pic.twitter.com/ISBeszy6YM
— India Post (@IndiaPostOffice) February 10, 2021
पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगचे फायदे
याद्वारे खातेदार घर बसल्या कोणालाही पैसे पाठवू शकतात आणि आपले खाते विवरण पाहू शकतात. याशिवाय आरडी, पीएफ, एनएससी योजनेशी संबंधित सर्व कामे ग्राहक इंटरनेट बँकिंगच्या मदतीने घरी बसून करू शकतात.
इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करण्यासाठीच्या अटी
पोस्टाची इंटरनेट बँकिंग सुविधा वापरण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिस वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, वैध एकल किंवा संयुक्त खात्यासह केवायसी संबंधित कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. तसे यासोबत सक्रिय एटीएम कार्ड देखील आवश्यक आहे. ग्राहकाचा मोबाईल नंबर त्याच्या संबंधित खात्याशी जोडलेला असावा. ईमेल आयडी देखील नोदानिकृत असावा. याचबरोबर ग्राहकाचा पॅन नंबर त्याच्या खात्यासह जोडलेला असावा. ज्या व्यक्तीने या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, केवळ तोच खातेदार आपले खाते इंटरनेट बँकिंगद्वारे वापरण्यास सक्षम असेल.
पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग कशी सुरू करावी?
त्यासाठी खातेदाराला प्रथम पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. यानंतरच त्याचे नेट बँकिंग सक्रिय होईल. जेव्हा इंटरनेट बँकिंग सक्रिय होईल, तेव्हा आपल्या मोबाईलवर एक एसएमएस अलर्ट येईल.
यानंतर तुम्हाला इंडिया पोस्टच्या नेट बँकिंग साईटवर जाऊन ‘New User Activation’ हायपरलिंकद्वारे ते सक्रिय करावे लागेल. यासाठी तुमचा ग्राहक आयडी किंवा सीआयएफ आयडी व अकाऊंट आयडी असणे आवश्यक आहे (Know Details about Post office savings account internet banking facility).
पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग वापरण्याची संपूर्ण प्रक्रिया :
स्टेप 1 : पोस्टच्या वेबसाईटवर जा (www.indiapost.gov.in).
स्टेप 2 : डाव्या बाजूला दिलेल्या पर्यायावर जा आणि ऑनलाईन बँकिंग या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर, ब्राउझरवर नवीन विंडो उघडण्यासाठी री-डायरेक्ट करण्याची परवानगी द्यावी लागेल. त्यासाठी Ok वर क्लिक करा.
स्टेप 4 : आता आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करावे लागेल.
स्टेप 5 : तुमचा नेटबँकिंग यूजर आयडी तयार न झाल्यास खालील विंडोमध्ये दिलेल्या ‘New User Activation’ पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 6 : त्यानंतर तुम्हाला कस्टमर आयडी आणि अकाऊंट आयडी विचारला जाईल. तो प्रविष्ट करा आणि Continue बटणावर क्लिक करा.
स्टेप 7 : आपल्याला खात्याशी संबंधित आणखी काही माहिती विचारली जाईल. विनंती केलेली माहिती दिल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करण्यास सांगितले जाईल.
स्टेप 8 : पासवर्ड जनरेट केल्यानंतर, आपला नेट बँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड सक्रिय होईल. आपण ते वापरुन खात्यात लॉग इन करू शकता.
स्टेप 9 : याबाबत कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी आपण 18004252440 कॉल किंवा dopebanking@indiapost.gov.in वर ई-मेल करू शकता.
(Know Details about Post office savings account internet banking facility)