डॉक्टरांपेक्षा जास्त आहे मुकेश अंबानींच्या शेफचा पगार, आकडा ऐकून व्हाल हैराण !
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे ' ॲंटिलिया ' हे निवासस्थान जगातील 10 महागड्या घरांपैकी एक आहे. येथे काम करणाऱ्या शेफचा पगार किती आहे, ते जाणून घेऊया.
मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नवव्या स्थानावर आहेत. तर ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती (2nd richest person)आहेत. त्यांनी भारतात आपले व्यावसायिक साम्राज पसरवण्यासोबतच जगभरातही त्यांच्या उद्योगाचा विस्तार केला आहे. मुकेश अंबानी हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील लोक त्यांना ओळखतात. जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी (Businessman) एक असलेले मुकेश अंबानी हे त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. त्यांचे ‘ ॲंटिलिया ‘ (Antilia) हे निवासस्थान जगातील 10 महागड्या घरांपैकी एक आहे. मुकेश अंबानींच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या शेफचा (chef) पगार किती असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
मुंबईतील ॲंटिलिया हाऊस हे मुकेश अंबानी यांचे शानदार निवासस्थान असून ते जगातील 10 महागड्या घरांपैकी एक आहे. लंडनमध्ये असलेल्या बकिंगहॅम पॅलेससह (ॲंटिलिया) ही जगातील सर्वात महागडी निवासी मालमत्ता आहे. हे घर अशा प्रकारे बांधले आहे की भूकंपाचे हादरेही त्याचे काही नुकसान करू शकत नाहीत.
रिश्टर स्केलवर 8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला तरी या घराची एक वीटही हलणार नाही. ॲंटिलियाच्या या 27 मजली इमारतीत 600 कर्मचारी काम करतात. हे 600 कर्मचारी त्यांच्या कामात अतिशय पारंगत असल्यामुळेच त्यांना त्यांच्या कामासाठी भरभक्कम पगारही दिला जातो.
किती आहे शेफचा पगार ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲंटिलियामध्ये काम करणाऱ्या शेफला दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जातो. तर काही शेफ्सचा पगार त्याहूनही अधिक आहे. आता तुम्ही असा विचार करत असाल की शेफ्सचा पगार जर लाखोंच्या घरात असेल तर ते खूप आलिशान किंवा अनोखे पदार्थ बनवत असतील.
पण त्याच उत्तर नाही, असं आहे. कारण मुकेश अंबानी यांना साधं, पारंपारिक गुजराती जेवण जेवायला आवडतं. त्यांना फार वेगळे, युनिक पदार्थ खायला आवडत नाहीत. याच कारणामुळे ॲंटिलियामधील शेफचं काम, हे साधं जेवण बनवणं एवढंच आहे. ॲंटिलियामध्ये काम करणाऱ्या शेफचा पगार साधारण 2 लाख रुपये आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे , देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या राजधानी दिल्लीतील एम्स ( AIIMS) रुग्णालयातील डॉक्टरचे वेतन सरासरी 1 लाख रुपये इतके आहे. अशा परिस्थितीत अंबानींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार एम्सच्या डॉक्टरांपेक्षा जास्त आहे.
ॲंटिलियाबद्दल सांगायचं झालं तर, ही शानदार इमारत 570 फूट उंच आणि 4,00,000 चौरस फुटांवर पसरलेली आहे. ॲंटिलियामध्ये 3 हेलिपॅड, 168 गाड्यांचे गॅरेज, एक बॉलरूम, 50 आसनांचे थिएटर, टेरेस गार्डन, स्पा आणि मंदिरही आहे.