Reliance Group : वहिनी, एमएम आणि अंबानी, रिलायन्स ग्रुप चालवितात हे 5 दिग्गज, त्यांच्यामुळेच व्यवसायाला चार चाँद

Reliance Group : रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील मोठ्या उद्योग समूहापैकी एक आहे. या उद्योग समूहात मुकेश अंबानी यांच्यासोबतच इतर अनेक लोकांचा सहभाग आहे, ज्यांनी रिलायन्सला ओळख निर्माण करण्यास मदत केली.

Reliance Group : वहिनी, एमएम आणि अंबानी, रिलायन्स ग्रुप चालवितात हे 5 दिग्गज, त्यांच्यामुळेच व्यवसायाला चार चाँद
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 11:36 AM

नवी दिल्ली : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि रिलायन्स (Reliance) अशी नावे आहेत, जी देशातच नाहीतर विदेशातही लोकप्रिय आहेत. रिलायन्स देशातील प्रमुख व्यावसायिक समूहापैकी एक आहे. रिलांयस इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) बाजारातील सध्याचे भांडवल 15.6 लाख कोटी रुपये आहे. आरआयएलच्या शेअरची किंमत (RIL Share Price) मंगळवारी 2305 रुपये होती. मुकेश अंबानी सध्या जगातील 12 ने सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का रिलायन्स ग्रुप एकटे मुकेश अंबानी चालवत नाहीत. प्रत्येक उद्योग समूह यशस्वी होण्यासाठी काही लोकांचे मोठे योगदान असते. रिलायन्स ग्रुपमध्ये पण असे पाच लोक आहेत. ज्यांच्यामुळे हा उद्योग समूह जोरात आगेकूच करत आहे.

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी आहेत. रिलायन्स ग्रुपला पुढे घेऊन जाण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बेधडक निर्णय घेण्यात त्यांचा हातखंड आहे. 5जी सेवा सुरु करण्यासाठी स्पेक्ट्रम खरेदी, जिओची सुरुवात करणे, मुंबई इंडियन्स क्रिकेट फ्रेंचाईजी घेणे यासारखे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत.

वडील धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्याकडून वारसारुपात मिळालेले मोठे औद्योगिक साम्राज्याचा त्यांनी प्रचंड विस्तार केला. या कामात त्यांना त्यांचे कुटुंबिय, मित्र, जुने सहकारी, नवीन प्रोफेशनल्स, व्यावसायिक प्रमुख आणि सल्लागारांनी मदत केली आहे.

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांना सर्वच जण वहिनी म्हणतात. मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमची फ्रेंचाईज मागे नीता अंबानी यांचे परिश्रम आहेत. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी मोठी भूमिका पार पाडतात. अनिल अंबानी यांनी तक्रार केली होती की, नीता, आनंद जैन आणि मनोज मोदी यांना झुकते माप देण्यात येते.

वर्ष 2010 मध्ये ईस्ट इंडिया होटल्स मध्ये 14.8 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यात नीता अंबानी यांची प्रमुख भूमिका होती. रिलायन्स फाऊंडेशनमध्येही त्यांची विशेष भूमिका आहे. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी सातत्याने मेहनत घेतात.

मनोज मोदी (Manoj Modi) यांचे नाव तुम्हाला कदाचित माहिती नसेल. ते कोणत्याच बातमीत नसतात. पण रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोदी एक प्रमुख व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमुख निर्णयात त्यांचा सहभाग असतो. त्यांना मुकेश अंबानी यांचा उजवा हात संबोधण्यात येते.

फेसबुक सोबत 5.7 अब्ज डॉलरचा करार करण्यात मनोज मोदी यांची प्रमुख भूमिका होती. ते मुकेश अंबानी यांचे वर्गमित्र होते. दोघांनी अभियांत्रिकीचे सोबतच शिक्षण घेतले आहे. त्यांना एमएम नावाने ओळखले जाते.

आकाश अंबानी (Akash Ambani) मुकेश आणि नीता अंबानी यांचे मोठे चिरंजीव आहेत. 28 जून 2022 रोजी त्यांना जिओ बोर्डाचे चेअरमन करण्यात आले. आकाशने बहिण ईशा सोबत 2015 मध्ये जिओची सुरुवात केली होती. त्यानंतर देशात 4 जी चे वारे वाहायला लागले. रिलायन्सच्या अनेक निर्णयात आकाश अंबानी यांचा सहभाग असतो.

ईशा अंबानी (Isha Ambani) मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी आहे. ती जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात आहे. 2014 मध्ये त्यांचे नाव आशियातील 12 शक्तिशाली भविष्यातील उद्योजिकांमध्ये घेण्यात आले होते. त्यांनी उद्योजक आनंद पीरामल यांच्यासोबत 2018 मध्ये लग्न केले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.