Petrol Diesel Rate Today : तेल कंपन्यांची चंगळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलात जोरदार घसरण सुरु असून कंपन्यांचा मोठा फायदा होत आहे. आज सर्वसामान्यांना एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी इतके रुपये खर्च करावे लागतील.
Ad
Follow us on
नवी दिल्ली : भारतीय तेल विपणन कंपन्यांची चंगळ सुरु आहे. कच्चा तेलाचे भाव घसरल्याने त्यांना मोठा फायदा होत आहे. आज 15 जून रोजी किंमतीत पुन्हा घसरण झाली. ब्रेंट क्रूड ऑईल 73.19 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 68.30 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा (Petrol Diesel Price) आजचा भाव काय आहे? आज सर्वसामान्यांना एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी इतके रुपये खर्च करावे लागतील.
दरात इतकी तफावत
तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते. केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.