SHARE MARKET : शेअर बाजारात घसरण, विक्रीचा वाढता ओघ; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला
कालच्या तेजीनंतर आज (बुधवार) शेअर बाजारात घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्समध्ये 300 अंकाहून अधिक घसरण झाली. तर निफ्टी 17250 पेक्षा कमी स्तरावर बंद झाला.
नवी दिल्ली– देशांतर्गत शेअर बाजारात (INDIAN SHARE MARKET) तेजी-घसरणीचं चित्र दिसून आलं. आज (बुधवार) दिवसाच्या सुरुवातीला बाजारात सकारात्मक सुरुवात झाली होती. मात्र, विक्रीच्या वाढत्या दबावामुळे घसरणीला सुरुवात झाली. बँक आणि ऑटो सेक्टरच्या (BANK AND AUTO SECTOR) शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. त्यामुळे गुंतवणुकदारांवर नाराजीचं सावटं पसरलं. कालच्या तेजीनंतर आज (बुधवार) शेअर बाजारात घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्समध्ये 300 अंकाहून अधिक घसरण झाली. तर निफ्टी 17250 पेक्षा कमी स्तरावर बंद झाला. दिवसअखरे सेन्सेक्स 304 अंकांच्या घसरणीसह 57,685 च्या स्तरावर पोहोचला. तर निफ्टी 70 अंकांच्या घसरणीसह 17246 वर बंद झाला. निफ्टी वर ऑटो निर्देशांकात (AUTO INDEX) 1 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविली गेली. तर फायनान्शियल निर्देशांकात 1 टक्क्यांनी घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी:
आज (बुधवार) प्रमुख आशियाई बाजारात खरेदीचा जोर राहिला. रशिया-युक्रेन घडामोडींकडे गुंतवणुकदारांच्या नजरा खिळल्या आहेत.काल (मंगळवार) Dow Jones मध्ये 254 अंकांची तेजी नोंदविली गेली आणि 34,807.46 च्या टप्प्यावर बंद झाला. क्रूडचे भाव आज 115 डॉलर प्रति बॅरेल नजीक पोहोचले आहेत.
पेटीएमचे अपडेट:
पेटीएम (Paytm) शेअर्समध्ये सूचीबद्ध (लिस्टिंग) केल्यानंतर वारंवार घसरण दिसून येत आहे. कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 2150 रुपये ठेवण्यात आली होती. दरम्यान, आज (बुधवार) शेअर इश्यू प्राइस पेक्षा 74 टक्क्यांनी घसरण होऊन 544 रुपयांवर येऊन ठेपला आहे. Paytm कडून स्टॉक्समध्ये होणाऱ्या घसरणीबाबत BSE ला स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनीच्या स्टॉक्स किंवा मार्केट प्राईसवर परिणाम करेल अशाप्रकारची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पेटीएमने म्हटले आहे.
आजचे वधारणीचे शेअर्स (Today top gainers):
• हिंदाल्को (%2.53) • डॉ.रेड्डीज लॅब्स् (%2.41) • डिव्हिज लॅब्स् (%2.36) • टाटा स्टील (%2.23) • यूपीएल (%1.66)
आजचे घसरणीचे शेअर्स (Today top loosers):
• एचडीएफसी (-2.25) • कोटक महिंद्रा (-2.11) • भारती एअरटेल (-1.99) • ब्रिटानिया(-1.78) • सिप्ला(-1.76)
‘या’ बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता