PPF : पीपीएफ खात्यातून रक्कम काढायची आहे, तर हा नियम लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठे नुकसान
PPF : PPF खात्यातून रक्कम काढायची असेल तर नियम पाळावे लागतील.
नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public provident fund) योजनेत अनेक जण गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूकदारांना कसलीच जोखीम नाही. ही योजना कर मुक्त आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला कर सवलत आणि कमाल गुंतवणुकीची संधी मिळते. त्यामुळे ही योजना लोकप्रिय आहे. पण PPF खात्यातून रक्कम काढायची असेल तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
PPF खात्यात 15 वर्षांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घकालासाठी गुंतवणूक केल्यास त्याला मोठा फायदा होतो. पीपीएफ खात्यात केवळ 1.5 लाख रुपयांपर्यंत पण गुंतवणूक करता येते. नियमीत गुंतवणूकदारांसाठी पण योजनेत फायदा होतो.
पोस्ट खात्याच्या संकेतस्थळानुसार, जर गुंतवणूकदाराला 15 वर्षापूर्वीच योजनेतून माघार घ्यायची असेल, खाते बंद करायचे असेल तर त्यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नाहीतर त्याचे मोठे नुकसान होते.
जर मॅच्युरिटी लवकर संपली तर पीपीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी नियम तयार करण्यात आले आहे. 2021 मधील दिशानिर्देशानुसार, 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच रक्कम काढता येते. जर तुम्ही 15 जून 2010 रोजी गुंतवणूक केली असेल तर 1 एप्रिल, 2026 रोजी मॅच्युरिटी पूर्ण होते.
या योजनेत मुदत वाढीची संधी मिळते. गुंतवणूकदाराला वाटल्यास तो योजना वाढवू शकतो. त्याला पुढील पाच वर्षांकरीता योजनेत अतिरिक्त गुंतवणूक करता येते. त्यामुळे तुमचा फायदा होतो. काही गुंतवणूकदार मुदत वाढ करुन त्याचा फायदा घेतात.
पीपीएफ खात्यातून सात वर्षांनंतर 50 टक्के रक्कम काढता येते. तुम्ही या खात्यातून दरवर्षी ठराविक रक्कम काढू शकतात. रक्कम काढण्यासाठी तुम्हाला पीपीएफचे पासबूक आणि एक अर्ज टपाल खात्यात जमा करावा लागतो.
जर दीर्घकालासाठी गुंतवणूक करताना तुम्हाला रक्कमेची गरज पडली तर ती काढता येते. 15 वर्षांपूर्वी रक्कम काढली. पीपीएफ खाते बंद केले तर त्यासाठी अटी व नियमांचे पालन करावे लागते. यामध्ये व्याज कमी होते.
PPF विथड्रॉल रेग्युलेशन अॅक्ट 2021 अंतर्गत, खात्यातील शिल्लक रकमेवर कर्ज घेता येते. मुळ PPF काढण्याच्या अटींनुसार,तिसऱ्या आर्थिक वर्षात व्याज घेता येते. त्यासाठी तुम्हाला 2% व्याज द्यावे लागते.