कोटकची खास योजना, एका वर्षात पैसे दुप्पट, एक हजारांपासून गुंतवणूक सुरु करा

| Updated on: May 10, 2021 | 1:29 PM

गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी कोटक स्मॉल कॅप फंड विषयी माहिती असणं आवश्यक आहे. Kotak Small Cap Fund

कोटकची खास योजना, एका वर्षात पैसे दुप्पट, एक हजारांपासून गुंतवणूक सुरु करा
Money
Follow us on

नवी दिल्ली: तम्ही जर शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी कोटक स्मॉल कॅप फंड विषयी माहिती असणं आवश्यक आहे. कोटक स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक केलेल्यांना एका वर्षात 122 टक्के परतावा, 5 वर्षांमध्ये 133 टक्के तर 16 वर्षांमध्ये 1126 टक्के परतावा मिळाला आहे. म्हणजे 10 हजारांच्या गुंतवणुकीवर अनेकांना 16 वर्षांत 1.22 लाख रुपये मिळाले आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार छोट्या कंपन्यांची कामगिरी चांगली सुरु असल्यानं चांगल्या प्रकारचा परतावा मिळू शकतो. यामुळे कोटक स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. (Kotak Small Cap Fund regular plan mutual fund investment get hundred percent return)

कोटक स्मॉल कॅप फंड नेमका काय आहे?

कोटक स्मॉल कॅप फंडचा 95.5 टक्के वाटा शेअर बाजारामध्ये लावला जातो. 4.5 टक्के रक्कम कॅश स्वरुपात ठेवली जाते. कोटक फंडच्या मॅनेजर पंकज टिबरेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार छोट्या कालावधीमध्ये बाजारामध्ये तेजी आणि घसरण पाहायला मिळू शकते. याचा परिणाम म्युच्युअल फंडवर देखील होऊ शकतो. मात्र, दिर्घकालीन गुंतवणुकीवर यामध्ये फायदा होऊ शकतो.

स्मॉल कॅप फंड नेमका काय असतो?

सेबीच्या निर्देशानुसार शेअर मार्केटमधील कंपन्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं असते. तर, स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमधील 65 टक्के रक्कम छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार शेअर बाजारातील 250 क्रमांकांच्या खाली असणाऱ्या कंपन्यांचा समावेश स्मॉल कॅपमध्ये होतो. 1 ते 100 मधील कंपन्यांना लार्ज कॅपमध्ये येतात. 101 ते 250 पर्यंतच्या कंपन्या मिडकॅपमध्ये येतात. स्मॉल कॅपमध्ये छोट्या कंपन्यांचा समावेश असतो. याकंपन्यांमधून चांगला फायदा मिळण्याची शक्यता असते. त्यासह यामध्ये जोखीम देखील अधिक असते.

किती परतावा मिळतो?

स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक केल्यास 3 ते 5 वर्षांमध्ये 15 ते 17 टक्के रिटर्न मिळतो. म्हणजेच मुदत ठेवीपेक्षा जादा परतावा म्युच्युअल फंडमधून मिळतो. स्मॉल कॅप फंडमधील गुंतवणूक दिर्घकाळासाठी फायदेशीर ठरते. नव्या गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसे लावू नयेत, नयेत असं म्हटलं जातं. कारण यामध्ये फायद्यासोबत जोखीम देखील आहे. जर एखादा गुंतवणूकदार स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करणार असेल तर किमान 15 वर्षे कालावधीसाठी पैसे गुंतवावेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

संबंधित बातम्या:

करोडपती व्हायचंय, मुच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक करुन 20 वर्षांनंतर मिळवा परतावा

केंद्र सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त आहे देशाच्या ‘या’ तीन कंपन्यांची संपत्ती!

(Kotak Small Cap Fund regular plan mutual fund investment get hundred percent return)