ऑटो सेक्टरच्या (Auto Sector) समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. सध्या भारतात सेमीकंडक्टर (Semiconductor crisis) चीपचा तुटवडा असून, याचा मोठा फटका हा भारतीय वाहन उद्योगाला बसत आहे. भारतात आधीच सेमी कंडक्टरचा तुटवडा होता, हा तुटवडा भरून काढण्यासाठी चीनकडून सेमीकंडक्टरची आयात करण्यात येत होती. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना संकट गडद बनले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा आयात प्रभावित झाली आहे. ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन (FADA)ने सादर केलेल्या आकडेवारीनुसार सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा मोठा फटका हा वाहन उद्योगाला बसला आहे. देशातंगर्त वाहनाच्या विक्रीमध्ये 4.87 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या मार्च महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहनाची एकूण विक्री 2 लाख 71 हजार 358 युनिट एवढी होती, तर मार्च 2021 मध्ये प्रवासी वाहनाची विक्री 2 लाख 85 हजार 240 युनिट एवढी होती. याचाच अर्थ वाहनाच्या विक्रीमध्ये हजारो युनिटने घट झाली आहे.
चीनमध्ये पुन्हा निर्माण झालेले कोरोना संकट आणि रशिया-युक्रेन युद्धाचा वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या मार्च महिन्यात दुचाकींच्या विक्रीमध्ये देखील मोठी घट झाली आहे. गेल्या महिन्यात दुचाकींच्या विक्रीमध्ये 4.02 टक्क्यांची घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात देशांतर्गत केवळ 11 लाख 57 हजार 681 दुचाकींचीच विक्री झाली आहे. मार्च 2021 मध्ये 12 लाख 6 हजार 191 दुचाकींची विक्री झाली होती. सामान्यपणे ग्रामीण भागात दुचाकी खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीमध्ये दिसत नसून, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, याचा मोठा फटका हा दुचाकी व्यवसायाला बसत आहे.
मार्चप्रमाणेच फेब्रुवारी महिना देखील वाहन उद्योगाला म्हणावा तितका चांगला राहिला नाही, फेब्रुवारी महिन्यात वाहन विक्रीमध्ये तब्बल 6.3 टक्क्यांची घसरण झाल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात 6.3 टक्क्यांच्या घसरणीसह एकूण 17.91 लाख यूनिटच वाहनांची विक्री झाली. हेच प्रमाण फेब्रुवारी 2021 मध्ये 21.77 लाख यूनिट एवढे होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रवासी कारच्या विक्रीत देखील 6.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये केवळ 1.67 लाख प्रवासी कारची विक्री झाली, तर फेब्रुवारी 202 1 मध्ये हेच प्रमाण 1.78 युनिट एवढे होते.
IIT Kanpur : बापरे बाप! शंभर कोटींची गुरुदक्षिणा, कोण आहे देणगी देणारा कोट्यधीश विद्यार्थ्यी?
Russia Ukraine war : काय बोलता! युद्ध ठरलं वरदान, काही देशांची 8 वर्षांची मंदी संपली