Jan Dhan : तुमचंही जनधन खातं होऊ शकतं बंद, केंद्र सरकारचा कारवाईचा कडक इशारा

Jan Dhan : तुमचंही जनधन खातं होऊ शकतं बंद, केंद्र सरकारचा कारवाईचा कडक इशारा

Jan Dhan : तुमचंही जनधन खातं होऊ शकतं बंद, केंद्र सरकारचा कारवाईचा कडक इशारा
खाते बंद होणार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 9:32 PM

नवी दिल्ली : सर्वच भारतीयांकडे बँक खाते (Bank Account) असावे यासाठी केंद्र सरकारने जन धन योजना (Jan Dhan Scheme) आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वकांक्षी योजना होती. त्यातंर्गत देशभरात झिरो बॅलन्स (Zero Balance) खाते उघडण्याची मोहिम राबिण्यात आली. त्याला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला. पण आता या योजनेतील एक चूक केंद्र सरकारच्या लक्षात आली आहे. त्यामुळे अनेक बँक खाती बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देशाचे अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagavat Karad) यांनी राज्यसभेत दिली.

देशभरात जवळपास 47.57 कोटी जनधन खाती 30 नोव्हेंबरपर्यंत उघडण्यात आली आहेत. यामधील 38.19 कोटी खाती सध्या उपयोगात आहेत. तर तब्बल 10.79 लाख नक्कल (Duplicate) खाती आहेत. ही चूक अर्थात संबंधित यंत्रणेची आहे. त्यांनी चुकीची प्रक्रिया राबवित ही खाती उघडल्याचा दावा करण्यात आला आहे.

यावर उपाय म्हणून आता 10.79 लाख खाती बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचे हे एखादे डुप्लिकेट जनधन खाते असेल. दोन दोन खाती असतील तर त्यातील एक खाते बंद होणार आहे. केंद्र सरकार एकापेक्षा अधिक खात्यांवर ही कारवाई करणार आहे. ही कारवाई होण्यापूर्वी तुम्हीही तुमचे खाते बंद करु शकता.

हे सुद्धा वाचा

अर्थराज्यमंत्र्यांनी खात्यांची समिक्षा आणि खाते उघडणे ही प्रक्रिया निरंतर सुरु असल्याचे म्हणणे मांडले. या प्रक्रियेतंर्गत जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड देण्यात येतात. तरीही 19.90 कोटी खातेधारकांकडे कोणतेही डेबिट कार्ड नसल्याचा दावा त्यांनी केला. तर 4.44 कोटी खातेधारकांनी रुपे कार्ड नुतनीकरण केलेले नाही.

मोदी सरकारने गरीब, दुर्बल आणि ग्रामीण भागातील घटकाला बँकिंग सेवा मिळाव्यात यासाठी जन धन खाते उघडण्यासाठी मोहिम राबविली. या खात्यातंर्गत एक लाख रुपयांचा दुर्घटना विमा संरक्षण देण्यात येते. तसेच 30,000 रुपयांचा जनरल इन्शुरन्स मिळतो. या खात्यात कमीतकमी रक्कम ठेवण्याची गरज नाही. तसेच 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.