Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या नवीन मित्रामुळे चीनच्या उरात धडकी, काय करते ही कंपनी

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या एका खेळीमुळे चीनच्या उरात धडकी भरली आहे. या कंपनीच्या मुठ्ठीत आहे जगातील मोठं-मोठ्या कंपन्या आहेत. यापूर्वी चीनने या कंपनीला थोपविण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश आले नाही.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या नवीन मित्रामुळे चीनच्या उरात धडकी, काय करते ही कंपनी
Mukesh Ambani
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 10:58 AM

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : जगातील सर्वात मोठी ॲसेट कंपनी ब्लॅकरॉक इंकने (BlackRock Inc.) 2018 मध्ये भारताला रामराम ठोकला होता. पण आता ही कंपनी पुन्हा भारताकडे वळली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत (Reliance Industries Ltd) तीने हात मिळवला आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (JFS) आणि ब्लॅकरॉकमध्ये 50:50 टक्के हिस्सेदारी असेल. जिओला ब्लॅकरॉकच्या गुंतवणूक व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, उत्पादन, इतर विशेष सेवांचा लाभ मिळेल. तर ब्लॅकरॉकला भारतात पुन्हा पाय ठेवायला जिओची मदत मिळेल. पण या नवीन करारामुळे चीनच्या चिंतेत भर पडली आहे.

काय करते ब्लॅकरॉक

ब्लॅकरॉक इंक ही अमेरिकेची मल्टिनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. जागतिक गुंतवणूक करणाऱ्या कंपनीकडे ॲसेट मॅनेजमेंटचा मोठा अनुभव आहे. या कंपनीचा व्यवसाय 9.43 ट्रिलियन डॉलर इतका प्रचंड आहे. गेल्या वर्षीपेक्षा या कंपनीने व्यवसायात 11 टक्क्यांची झेप घेतली आहे. तर गेल्या तिमाहीत कंपनीने चार टक्के वाढ नोंदवली. भारताच्या जीडीपीपेक्षा जवळपास ही तिप्पट तर अमेरिकेच्या जीडीपीच्या निम्मे आहे.

हे सुद्धा वाचा

जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये मोठा हिस्सा

या कंपनीच्या उलाढालीचा आकडा थक्क करणारा आहे. आफ्रिका खंडातील अनेक देशांची अर्थव्यवस्था एकत्र केली तरी ही कंपनी सरस आहे. जगातील एकूण शेअर्स आणि बाँड्सचा 10 टक्के हिस्सा या कंपनीचा आहे. ही जगातील एक प्रकारची शॅडो बँक आहे. जगातील अनेक सेक्टरमधील दिग्गज कंपन्यांमध्ये या ब्लॅकरॉक इंकचा वाटा आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये हिस्सेदारी

जगातील सर्वात श्रीमंत कंपनी ॲप्पलमध्ये या कंपनीचा 6.5 टक्के इतका वाटा आहे. व्हेरिझॉन आणि फोर्डमध्ये 7.25%, फेसबुकमध्ये 6.5%, वेल्स फर्गोमध्ये 7%, जेपीमोर्गनमध्ये 6.5% आणि जर्मनीच्या डॉयचे बँकमध्ये 4.8% हिस्सा आहे. गुगलची मुळ कंपनी अल्फाबेट इंकमध्ये ब्लॅकरॉकचा वाटा 4.48% आहे. भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये मोठा वाटा आहे.

लॅरी फिंक कोण?

तर या जागतिक जायंट कंपनीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. लॅरी फिंक (Larry Fink) यांनी ही कंपनी उभी केली. तेच कंपनीचे सीईओ आणि चेअरमन आहेत. फिंक राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत. त्यांना पैसा कमाविण्याचा छंद जडला. इच्छा असते पण कोणालाही सहजासहजी असा छंद जडत नाही. फिंकने शेअर बाजारात नशीब आजमावले.

चीनला धोबीपछाड

ही कंपनी चीनमध्ये येऊ नये यासाठी चीनच्या कम्युनिस्ट सरकारने सर्व हातखंडे वापरले. पण चीनला ही कंपनी पुरुन उरली. चीनच्या इतिहासातील हे दुर्मिळ उदाहरण असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. या कंपनीला शह देण्याचे सर्व प्रयत्न चीनने केले. पण फायदा झाला नाही. आता भारतात ही कंपनी पुन्हा दाखल होत असल्याने चीनने सावध भूमिका घेतली आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.