Income Tax Return News | ITR भरण्याचा शेवटचा आठवडा, न भरल्यास नुकसान तर होणारच पण भूर्दंड ही बसणार

Income Tax Return News | सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीला कमाईवर आयकर भरावा लागतो. उत्पन्न वेतनातून मिळो वा त्यांच्या व्यवसायातून, प्रत्येकाला कराचे दायित्व, जबाबदारी पूर्ण करावी लागते.

Income Tax Return News | ITR भरण्याचा शेवटचा आठवडा, न भरल्यास नुकसान तर होणारच पण भूर्दंड ही बसणार
कर भरा झटपटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 5:36 PM

Income Tax Return News | प्राप्ती कर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख जवळ आली असून, कर भरण्यासाठी तुमच्याकडे अगदी एक आठवड्याचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत इतर दोन कामं कमी करुन हे काम हात वेगळं करणे गरजेचे आहे. ठरलेल्या तारखेपर्यंत (Last Date) इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ही 31 जुलै आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत करदाते आर्थिक वर्ष 2021-22 किंवा कर निर्धारण वर्ष (Assessment Year) 2022-23 चे रिटर्न भरू शकतात. प्राप्तीकर जमा न केल्यास तुम्हाला त्याचे परिणाम ही सहन करावे लागतील. नुकसान तर होईलच पण तुम्हाला आर्थिक भूर्दंड ही बसेल. आयकर विभागाकडून आयकराची (Income Tax Department) नोटीस येईल. यानंतर तुम्हाला टॅक्स(Tax) भरावा लागेल, तसंच दंडही (Penalty) भरावा लागेल. तुम्ही वेळेत आयकर भरला नाही तर काय समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल, याचा हा घेतलेला आढावा.

आता अंतिम तारखेची वाट पाहू नका

आता करदात्यांनी अंतिम तारखेची वाट पाहू नये आणि कर भरण्याचे तातडीचे काम लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहनही प्राप्तिकर विभाग (ITD) सातत्याने केले आहे देय तारखेपर्यंत आयकर विवरणपत्र न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागण्याची शक्यात

शेवटच्या तारखेची वाट पाहू नका

करदात्यांनी अंतिम तारखेची वाट पाहू नये आणि हे तातडीचे काम लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहनही प्राप्तिकर विभाग (ITD) सातत्याने करत असतो. नुकसानीबद्दल बोलायचे झाल्यास, देय तारखेपर्यंत आयकर विवरणपत्र न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही आयकर विवरणपत्र भरले नाही, तर आयकर विभागाकडून आयकराची नोटीस येईल. यानंतर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, तसंच दंडही भरावा लागेल.

हे सुद्धा वाचा

पाच हजार रुपयांपर्यंत दंड

आता आपण ठरलेल्या तारखेपर्यंत आयटीआर न भरल्याबद्दल दंडाची रक्कम किती द्यावी लागेल याची माहिती घेऊयात. जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. त्याचबरोबर तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

याठिकाणी होईल उपयोग

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला बँकेकडून कर्ज घेणे, टीडीएस क्लेम करणे, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे किंवा व्हिसा अर्जाची प्रक्रिया सोपी होईल. आयटीआर तुमच्यासाठी उपयोगी पडतो. याशिवाय उत्पन्नाचा आणि ओळखीचा पुरावा म्हणूनही तुम्ही त्याचा वापर करू शकता.

या अडचणींचा करावा लागेल सामना

1 कर्ज मिळण्यात अडचण येईल

कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज घेण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाकडे पाहते. त्यानंतर अर्जदाराच्या आर्थिक क्षमतेनुसार कर्ज मंजूर केले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही भरलेले इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) खूप उपयुक्त ठरू शकते. त्यातून तुमच्या उत्पन्नाची खात्री पटते. तुमच्या आयटीआरमध्ये टाकलेल्या माहितीच्या आधारेच कर्ज देणाऱ्या अनेक वित्तीय संस्था आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते.

2 मोठे विमा संरक्षण मिळण्यात अडचण

बँकेकडून कर्जाव्यतिरिक्त जर तुम्हाला स्वतःसाठी 1 कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळवायचं असेल तर तुमच्याकडे करपात्र उत्पन्नाची चौकशी केली जाते. त्यासाठी ITR खूप उपयुक्त आहे. अनेक विमा कंपन्या विमा संरक्षण मिळवण्यासाठी तुमच्याकडे आयटीआरची मागणी करतात. खरे तर विमा कंपन्या आयटीआरच्या माध्यमातून तुमचे उत्पन्न आणि तुमची नियमितता तपासतात आणि त्या आधारे अंतिम निर्णय घेतात.

3 व्यवसायाच्या विस्तारात व्यत्यय

जरी तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल आणि त्याचा विस्तार करू इच्छित असाल, तरीही त्याचा तुम्हाला खूप उपयोग होतो. सरकारी विभागात अथवा मोठ्या कंपन्यांमध्ये उत्पादन खरेदी करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येतात. त्यासाठी ज्या व्यावसायिक दोन तीन वर्षांचा आयटीआर भरत असतील, त्यांना अशावेळी प्राधान्य दिले जाते. तसाच नियमच करण्यात आलेला आहे. तुमच्याकडे नियमीत आरटीआर भरलेला नसेल तर तुम्ही या योजनेत पात्र ठरत नाहीत.

4 म्युच्युअल फंडात मोठ्या गुंतवणुकीवर बंदी

इन्कम टॅक्स रिटर्न आयटीआर फाइल केल्याने तुम्हाला घर खरेदी-विक्री करता येते. एवढंच नाही तर तुम्हाला मोठी रक्कम बँकेत जमा करता येते तसेच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येते. तुम्ही आयटीआर फाइल केला नाही, तर म्युच्युअल फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवल्यास अडचण वाढू शकते आणि आयकर विभागाकडून नोटीस मिळण्याचा धोका वाढतो.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.