गूडन्यूज! 5G चे दिवस आता फार दूर नाहीत! 5G स्पेक्ट्रमच्या लिलावास मंजुरी, कधी पासून सुरु होणार 5G सेवा?
5G Network : 5G आल्यानंतर सगळ्यात आधी इंटरनेट स्पीडमध्ये कमालीची वाढ होईल.
नवी दिल्ली : भारतात 5Gच्या लिलावास (5G Auction) मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Cabinet Ministry) 5Gचा लिलाव करण्यास मंजुरी दिली असून आता लवकरच भारतातील टेलिकॉम कंपन्यानं (Indian Telecom companies) 5G सेवा देखील ग्राहकांना देऊ शकणार आहे. 5Gच्या लिलावात यशस्वी ठरणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना देशभरात 5G सेवा पुरवण्याची परनावगी देण्यात येईल. अजूनतरी भारतात 5G सेवा कधी सुरु होणार, याबाबतची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. पण गेल्या वर्षभरापासून 5G बाबत महत्त्वपूर्ण घोषणा होण्याच्या अनुशंगाने घडामोडींना वेग आला होता. आताच्या फोर जीच्या युगात 5Gचा वेग हा दुप्पट असणा आहे. त्यामुळे ही तंत्रज्ञान क्षेत्रातली मोठी क्रांती असेल, असं मानलं जातंय. शिवाय अनेक गोष्टीही बदलतील, असा विश्वासही व्यक्त केला जातोय.
दूरसंचार मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार, पुढील वीस वर्षांसाठी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल. 72 Ghz वर हा लिलाव होणार असल्याचं सांगितलं जातंय. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं टेलकॉम कंपन्यांकडून 5Gच्या चाचण्या केल्या जात आहेत. 5G सेवा सुरु झाल्यात डाऊनलोड आणि अपलोडसाठी अनन्यासाधारण वेग मिळेल, असा विश्वास व्य्कत केला जातोय.
Continuing the #TelecomReforms, development and setting up of Private Captive Networks will be enabled.#BharatKa5G pic.twitter.com/ALQV0SaZeA
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 15, 2022
कधी पार पडणार लिलाव?
जुलै महिन्याच्या अखेरीस 5G स्प्रेक्ट्रमचा लिलाव पार पडेल, अशी शक्यताय. स्पेक्ट्रम लिलिलावामध्ये तीन प्रकारच्या मेगा हर्ट्सचा (MHz) चा समावेश असेल. मिड आणि हाय ब्रॅन्ड स्पेक्ट्रम वापरुन 5G सेवा रिलीझ केली जाण्याची शक्यताय. स्पेक्ट्रम लिलालामध्ये कमी मेगा हर्ट्झ, मध्यम मेगा हर्ट्झ आणि हाय गिगा हर्ट्झ यांचा समावेश असणार आहे.
5G स्पेक्ट्रम साठी टेलिकॉम कंपन्यांनीही कंबर कंसली आहे. त्यासाठी पायाभूत सुविधाही तयार केल्या जात आहेत. मेट्रो शहरांसह मोठ्या शहरामध्ये फायजी सेवा सुरुवातीच्या टप्प्यात सुरु केली जाण्याची शक्यता असल्याचं एका अहवालातून सांगण्यात आलंय.
5G मुळे काय काय बदलणार?
5G आल्यानंतर सगळ्यात आधी इंटरनेट स्पीडमध्ये कमालीची वाढ होईल. इंटरनेट स्पीड 10 पटींना वाढेल. शिवाय ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलचा दर्जाही सुधारेल. तसंच गेमिंग क्षेत्रात अमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. 5G मुळे IoT उपकरांचा वापर वाढून घरं स्मार्ट होतील. शिवाय ड्रोनद्वारे शेतीची काळजी घेणं, ड्रायव्हरलेस गाड्या, अशा सगळ्या बाबीही नव्यानं बाजारात पाहायला मिळतील, असा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय.