तिरूपती बालाजी मंदिराकडून शिकलो, गर्दीवर नियंत्रण कसे मिळवायचे ? बिगबाजारचे किशोर बियानी यांनी सांगितलं गुपित

जेरोधाचे को फाऊंडर निखिल कामथ यांच्या पॉडकास्ट सिरीजच्या नव्या एपिसोडमध्ये त्यांनी फ्यूचर ग्रुपच्या किशोर बियानी यांची खास मुलाखत घेतली. बुधवारी सकाळी या मुलाखतीचा ट्रेलर जारी झाला आहे.

तिरूपती बालाजी मंदिराकडून शिकलो, गर्दीवर नियंत्रण कसे मिळवायचे ? बिगबाजारचे किशोर बियानी यांनी सांगितलं गुपित
bigbazar - kishore biyaniImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 2:24 PM

नवी दिल्ली :  भारतीयांना मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायला भाग पाडण्याचे सारे श्रेय ‘बिग बाजार’ला जाते. आज बिग बाजाराची पॅरेंट कंपनी ‘फ्यूचर रिटेल’ ( future retail ) कर्ज बाजारी झाली आहे. ‘बिग बाजार’चा ( big bazaar ) सेल आणि त्याच्या जाहीराती यांना आकर्षित होऊन एकेकाळी इतकी गर्दी लोटायची कि त्यांना हाताळणे मोठ्या कौशल्याचे काम होते. एका मुलाखतीत किशोर बियानी यांनी मॉलची गर्दी कशी हाताळली याचे सारे श्रेय तिरूपती बालाजीला दिले आहे. आज ‘बिग बाजार’ केव्हाही विकली जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. किशोर बियानी यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीचा रूबाब मात्र कायम आहे.

आजही शॉपिंगला जाताना ‘बिग बाजार’ चे नाव तोंडावर येते. किशोर बियानी यांच्या नेतृत्वाखालील बिगबाजार रिटेल चेन एकेकाळी या क्षेत्रातील दादा कंपनी होती. बिग बाजारात आपल्या गरजेच्या साऱ्या वस्तू एका जागी मिळायच्या. बिगबाजार सेलच्या जाहीराती पाहून शॉपिंगसाठी मोठी गर्दी उसळत असायची त्यामुळे या गर्दीला मॅनेज कसे करायचा असा सवाल त्यांना एका पॉडकास्टमध्ये करण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की ते आंध्रप्रदेशातील तिरूपती बालाजी मंदिरात तेथील गर्दी कशी मॅनेज केली जाते हे पाहण्यासाठी खास तेथे गेले. तेथून क्राऊड मॅनेजमेंटचे धडे शिकून घेतले. तेथील तंत्र बिग बाजार स्टोअर्समध्ये वापरण्यात आले. त्यामुळे बिग बाजारची गर्दी मॅनेज करायला जमल्याचे त्यांनी सांगितले.

जेरोधाचे को फाऊंडर निखिल कामथ यांच्या पॉडकास्ट सिरीजच्या नव्या एपिसोडमध्ये त्यांनी फ्यूचर ग्रुपच्या किशोर बियानी यांची खास मुलाखत घेतली. बुधवारी सकाळी या मुलाखतीचा ट्रेलर जारी झाला आहे. निखिल कामथ यांनी किशोर बियानी यांना इंडीयन रिटेलचा GOD FATHER म्हटले आहे. या मुलाखतीत जीवन फार अवघड नाही. केवळ स्वत: वर आत्मविश्वास असायला हवा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

125 शहरात 250 बिग बाजार स्टोअर

फ्यूचर रिटेल कंपनीद्वारे बिग बाजार स्टोअरची सुरूवात साल 2001 मध्ये झाली होती. ही रिटेल स्टोअरची एक चेन होती. जी अत्यंत वाजवी दरात ग्राहकांना वस्तू विकण्याकरीता प्रसिद्ध झाली. येथे थेट निर्मात्याकडून वस्तू पोहचत असल्याने ग्राहकांना स्वस्तात वस्तू विकणे परवडणारे होते. देशातील 125 शहरात 250 बिगबाजार स्टोअर उघडले गेले. बिग बाजार सुरूवातील प्रचंड नफ्यात होते. परंतू नंतर बाजारात अन्य स्पर्धक उतरले. वाढत्या ई- कॉमर्स कंपन्या, वाढते कर्ज, रोख तुटवडा यामुळे कंपनी तोट्यात गेली आहे.

विक्रीचा सौदा फिस्कटला

किशोर बियानी यांनी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला 24,713 कोटीत बिग बाजारला विकण्याचा सौदा केला आहे. परंतू Amazon कंपनीने या सौद्याला आव्हान दिल्याने सौदा झाला नाही. आता पुन्हा एक विक्री प्रक्रियेला वेग आला आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.