Gulf Countries | आखाती देशातून चिठ्ठी सोडा, पैशांची खेप ही नाही, रसद आटल्याने महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांना चिंता

Gulf Countries Money | आखाती देशात कमाई करणाऱ्या भारतीयांकडून देशातील नातेवाईकांना पैशांची रसद पाठवली जायची. पण आता ही रक्कम अर्ध्यावर आली आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यात येणारी पैशांची आवक आटली आहे.

Gulf Countries | आखाती देशातून चिठ्ठी सोडा, पैशांची खेप ही नाही, रसद आटल्याने महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांना चिंता
परदेशी आवक घटली Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 1:18 PM

Gulf Countries Remittance | “चिठ्ठी आयी है” गाण्याने उभा भारताला 80 च्या दशकात रडवलं होतं. आखाती देशात पैसे कमवायला (Gulf Countries Remittance) जाणाऱ्या भारतीयांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ताटातुटीची, आर्थिक ओढताणीचे चित्रण या चित्रपटात होते. तेव्हापासून सर्वांना बक्कळ पैसा कमवण्यासाठी आखाती देश, खाडी देश खुणावतात. पण आता या स्वप्नांना ही सुरुंग लागला आहे. पूर्वी खाडी देशातून भारतात मोठ्या प्रमाणात पैसा येत होता. नातेवाईकांना पोस्टाद्वारे (Post Office) मोठी रक्कम मिळत होती. परंतू हा ट्रेंड आता बदलला आहे. 2016-17 पासून भारतात आखाती देशातून येणाऱ्या रक्कमेत खूप कमी आली आहे. ही रक्कम अर्ध्यावर आली आहे. आता तर हा हिस्सा 30 टक्क्यांवर आला आहे. आखाती देशातून रसद कमी झाली असली तरी अमेरिका आणि अन्य विकसीत राष्ट्रातून (America and Development Countries) भारतात येणारा पैसा वाढला आहे. सर्व प्रकाराचा बदल होत असताना आणि जागतिक आव्हानं (Global Challenges)असताना ही भारतात पैशांची येणारी खेप कमी झाली नाही. इतर राष्ट्रांपैकी स्वदेशी रक्कम पाठविण्यात (remittance)भारतीय अद्यापही आघाडीवरच आहेत.

आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षात परदेशातून भारतात 89 अरब डॉलर रुपयांची खेप आली. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात विदेशातून मोठा रक्कम मिळाली. परंतू, आता ही आवक आटली आहे. त्याचा परिणाम राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. खाडी देशात मोठ्या प्रमाणावर अकुशल भारतीय कामगार काम करतात. तर अमेरिका आणि विकसीत राष्ट्रांत उच्चशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात राबते. त्यांच्याकडून येणारी आवक ही चांगली असली तरी हा वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे पाठवत नाही.

हे सुद्धा वाचा

भविष्यात परिस्थिती आणखी कठीण

गेल्या काही वर्षांपासून परदेशात स्थायिक होणऱ्या भारतीयांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामध्ये उच्चशिक्षित आणि कुशल वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 3 वर्षात 3.9 लाख जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे आणि त्यांनी विदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. 3.9 लाख भारतीयांपैकी 1.7 लाखांहून अधिक भारतीय अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. देश सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांकडून देशात पाठविण्यात येणारी रक्कम नगण्य मानण्यात येते. हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने परदेशी आवक सुद्धा घटली आहे आणि भविष्यात त्यात आणखी कमी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यातील अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.