Gold Silver Price Today : चांदीत गुंतवणूक करा सोन्यावाणी! आजचा भाव घ्या जाणून

Gold Silver Price Today : चांदीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गेल्या तीन दिवसांत चांदीत मोठी तूट आली. सोन्याचा भाव झरझर उतरला. दुपारच्या सत्रानंतर भावात अजून घसरण होईल की वाढेल?

Gold Silver Price Today : चांदीत गुंतवणूक करा सोन्यावाणी! आजचा भाव घ्या जाणून
आजचा भाव घ्या जाणून
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 9:19 AM

नवी दिल्ली : सोन्यापेक्षा चांदीने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. गेल्या तीन दिवसांत चांदीत मोठी तूट आली. सोन्याचा भाव झरझर उतरला. 12 मे रोजी संध्याकाळच्या सत्रात सोन्यात मोठी घसरण नोंदविण्यात आली. प्रति दहा ग्रॅममागे 450 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळचे भाव अद्याप अपडेट झाले नसले तरी भावात घसरणीचा अंदाज बांधण्यात येत आहे. जागतिक बाजारात डॉलरचा दबाव आणि मंदीची भीतीने हा परिणाम साधला आहे. दुपारनंतर सोने आणि चांदी (Gold Silver Price) कूस बदलतात का याकडे गुंतवणूकदारांसह तज्ज्ञांचे पण लक्ष लागले आहे.

काय होता भाव गुडरिटर्न्सनुसार, 10 मे रोजी सोन्याने उसळी घेतली होती भाव 250 रुपयांनी वाढले. 11 मे रोजी भावात मोठा उलटफेर झाला नाही. तर 12 मे रोजी संध्याकाळी 22 कॅरेट सोन्यात 450 रुपयांची घसरण झाली. हा भाव 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्यात 440 रुपयांची घसरण झाली. हा भाव 61,840 रुपये झाला.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,964 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,720 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,843 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज ibjarates सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केलेला नाही. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,723 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

हे सुद्धा वाचा

चांदीत गुंतवणूक फायदेशीर 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता. 10 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदी किलोमागे 100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,000 रुपये झाला आहे. 11 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये होता. 12 मे रोजी चांदीत 2600 रुपये प्रति किलो घसरण होऊन भाव 75,000 रुपये किलो झाला.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

अशी तपासा शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.