LIC | एलआयसीची ग्राहकांसाठी नवी सुविधा, ‘हे’ फायदे होणार

रोना काळात पॉलिसीधारकांना मदत करण्यासाठी LIC ने आपल्या पोर्टच्या माध्यमातून युलिप पॉलिसीअंतर्गत ऑनलाईन फंड्स स्विच करण्याची परवानगी दिली आहे.

LIC | एलआयसीची ग्राहकांसाठी नवी सुविधा, 'हे' फायदे होणार
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 5:41 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमने (Life Insurance Corporation Of India) आपल्या करोडो पॉलिसीधारकांना (LIC Allows Online Switching Of ULIPS) नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोरोना काळात पॉलिसीधारकांना मदत करण्यासाठी LIC ने आपल्या पोर्टच्या माध्यमातून युलिप पॉलिसीअंतर्गत ऑनलाईन फंड्स स्विच करण्याची परवानगी दिली आहे. एलआयसीने शुक्रवारी सांगितलं, ही सुविधा त्या पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध असेल जे त्यांच्या प्रमुख सेवांसाठी रजिस्टर असतील (LIC Allows Online Switching Of ULIPS).

पॉलिसीधारकांना ही सुविधा मिळणार

फंड्सची ही ऑनलाईन स्विचिंग सुविधा नवीन एन्डोमेंट प्लस (New Endowment Plus) (प्लान 935), निवेश प्लस (प्लान 849) (Nivesh plus- Plan 849) आणि एसआयआयपी (प्लान 852) (SIIP- Plan 852) यासाठी उपलब्ध असेल. यासाठी काहीही शुल्क लागमार नाही.

दिवसाला एक पॉलिसी स्विच करता येणार

या सुविधेअंतर्गत तुम्ही एका दिवसाला एकच पॉलिसी स्विच करता येणार आहे. ही एक ओटीपी आधारिक प्रमाणीकरण प्रणाली असेल. विमा कंपनीने मराठी, तामिळ आमि बंगाली या ग्राहकांना समर्थन देण्यासाठी एक बहुभाषी कॉल सेंटरही सुरु केलं आहे. एलआयसीची ही योजना भविष्यात आणखी क्षेत्रिय भाषांना जोडण्याची आहे. सप्टेंबर 2018 मध्ये कॉल सेंटर सेवा फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध होते (LIC Allows Online Switching Of ULIPS).

एलआयसी आपल्या ग्राहकांना प्रिमियम आणि याबाबतच्या सूचना पाठवतो. या सूचना ग्राहकांच्या मोबाईलवर नोटिफीकेशन अलर्टच्या रुपात पाठवण्यात येतं. एलआयसीकडून या सूचना प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स एलआयसीवर रजिस्टर करावं लागणार आहे.

LIC Allows Online Switching Of ULIPS

संबंधित बातम्या :

फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, टॅक्स बचतीसोबत ‘हे’ आहे फायदे

अपघात विमा योजनेत 1 एप्रिलपासून मोठे बदल, 2.5 लाख ते 1 कोटीपर्यंत मिळणार लाभ

Atal Pension Yojana: दर महिन्याला फक्त 42 रुपये गुंतवणूक करा; आयुष्यभर खात्यात येणार पैसे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.