LIC : या 3 पॉलिसींचा जबरदस्त परतावा, 1 लाखांचे झाले 18.50 लाख, SIP च्या माध्यमातून अनेकांची चांदी..

LIC : एलआयसीच्या या तीन योजनांनी गुंतवणूकदारांना जोरदार फायदा मिळवून दिला आहे.

LIC : या 3 पॉलिसींचा जबरदस्त परतावा, 1 लाखांचे झाले 18.50 लाख, SIP च्या माध्यमातून अनेकांची चांदी..
म्युच्युअल फंडातून कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 12:05 AM

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडाळाच्या (LIC) शेअरने (Share) गुंतवणूकदारांची घोर निराश केली आहे. जेव्हापासून हा शेअर सुचीबद्ध झाला आहे, तेव्हापासून तो आयपीओची किंमत गाठू शकला नाही. सुचीबद्ध झाल्यापासून हा शेअर दबावा खाल आहे. आयपीओ किंमती पेक्षा तो 32 टक्के घसरला. या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचे जवळपास 2 लाख कोटी रुपये डुबले आहेत.

LIC चे अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना मालमाल केले आहे. गेल्या 20 वर्षांत या म्युच्युअल फंड योजनांनी 18.50 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी विमा योजना म्युच्युअल फंडातही व्यवसाय करते. विमा कंपनीची म्युच्युअल फंड योजनेत गेल्या 20 वर्षात 10 टक्के ते 16 टक्क्यांचा वार्षिक फायदा झाला आहे. एक लाख गुंतवणूक करणाऱ्यांना 18.70 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

LIC MF Large Cap Fund ने 20 वर्षात जवळपास 15.76% परतावा दिला आहे. या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 18.70 लाख रुपये इतकी झाली. ज्यांनी या योजनेत दरमहा 10,000 रुपयांची SIP केली. त्यांना 1.10 कोटी रुपये मिळाले.

LIC MF Large Cap Fund योजनेत कमीत कमी एकरक्कमी 5,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. तर कमीत कमी 1,000 रुपयांची SIP करता येते. या योजनेत साधारणपणे 15.76% परतावा मिळाला आहे.

LIC MF Tax Plan ने 20 वर्षांत साधारणपणे 14 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या योजनेत एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना 13.75 लाख रुपये मिळाले. ज्यांनी दरमहा 10,000 रुपयांची एसआयपी केली. त्यांना 20 वर्षांत 1 कोटी रुपये मिळाले. या योजनेत एकरक्कमी 500 रुपयांची गुंतवणूक करता येते.

LIC MF Flexi Cap Fund ने 20 वर्षांत जवळपास 12.85 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेत एक रुपये गुंतवणूक केली असती तर परताव्यासह ही रक्कम 11.20 लाख रुपये झाली असती. ज्यांनी दरमहा 10,000 रुपयांची एसआयपी केली. त्यांना 20 वर्षांत 81,89,994 रुपये मिळाले. या योजनेत एक रक्कमी 5000 रुपयांची गुंतवणूक करता येते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.