एलआयसीकडे तुमचे पैसे आहेत, पण तुम्हाला ठाऊक नाही; जाणून घ्या ऑनलाईन पद्धतीने तुमची रक्कम

एलआयसीच्या खात्यामध्ये डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, सर्व्हाव्हल बेनिफिट्स, प्रीमियम रिफंड किंवा इनडेमनिटी क्लेमच्या रुपात जमा आहेत. तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटवर जाऊन या रक्कमांचा सहज शोध घेऊ शकाल. (LIC has your money, but you don’t know; Find out your money online)

एलआयसीकडे तुमचे पैसे आहेत, पण तुम्हाला ठाऊक नाही; जाणून घ्या ऑनलाईन पद्धतीने तुमची रक्कम
lic
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 1:30 AM

नवी दिल्ली : अनेकदा आपण एलआयसीची पॉलिसी घेतो. पुढे काही महिने त्या पॉलिसीचे हप्तेही भरतो. मात्र कालांतराने काही ना काही आर्थिक अडचणींमुळे आपणाला त्या पॉलिसीचे हप्ते भरता येत नाही. अशा परिस्थितीत आपण हप्ते भरत नाहीच, त्याचबरोबर पुढे एलआयसीकडे भरलेल्या पैशांचाही आपल्याला विसर पडतो. ते पैसे बुडित गेल्याची कल्पना आपण स्वत:च करून घेतो आणि मग एलआयसीच्या शाखेत जाणेही टाळतो. एलआयसीकडे अशी बरीच प्रपोजल असतात, जी अर्ध्यावर बंद केलेली असते. एलआयसीच्या नियमानुसार अनेक पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीचे लाभ देणे एलआयसीला बंधनकारकही असते. मात्र पॉलिसीधारकच पुढे न आल्यामुळे एलआयसीकडे पॉलिसीधारकाच्या पॉलिसीची रक्कम तशीच असते. कोणी क्लेमच केला नाही, तर एलआयसी पैसे देत नाही. पण एलआयसीकडे जमा केलेल्या हप्त्यांच्या रक्कमेचे काय? तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांतच हे जाणून घेऊ शकता की तुम्हाला एलआयसीकडून काही पैसे मिळणार आहेत की नाही? (LIC has your money, but you don’t know; Find out your money online)

एलआयसीच्या विविध प्रकारचे पैसे जमा आहेत, ज्या रक्कमेवर अद्यापपर्यंत कोणी क्लेम केलेला नसतो. हे पैसे परत करण्यासाठी काही निश्चित अवधी असतो, ज्या अवधीनंतर ती रक्कम अनक्लेम्ड प्रॉपर्टी अर्थात विनादाव्याची संपत्ती म्ळणून घोषित केले जाते. जर तुम्हाला आठवत असेल की आपली किंवा आपल्या कुटुंबियांचीही पॉलिसी काढण्यात आली होती, तर त्या पॉलिसीच्या रक्कमेबाबत तुम्ही जाणून घेऊ शकता. एलआयसीच्या खात्यामध्ये डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, सर्व्हाव्हल बेनिफिट्स, प्रीमियम रिफंड किंवा इनडेमनिटी क्लेमच्या रुपात जमा आहेत. तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटवर जाऊन या रक्कमांचा सहज शोध घेऊ शकाल.

कसे जाणून घेऊ शकता?

तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथील ‘Unclaimed-Policy-Dues’वर किंवा https://licindia.in/Bottom-Links/Unclaimed-Policy-Dues थेट लिंकवर क्लिक करावे लागेल. तेथे तुमच्या पॉलिसीचा तपशील मागितला जाईल. तो तपशील भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या संबंधित पॉलिसीचे काही पैसे एलआयसीकडे जमा आहेत की नाही, हे जाणून घेता येईल.

नेमका काय तपशील द्यावा लागेल?

एलआयसी पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचे नाव, जन्मतारीख, पॅन कार्ड इत्यादींची माहिती द्यावी लागेल. काही फिल्ड्सची माहिती देणे अनिवार्य असते तर फिल्ड्सची माहिती उपलब्ध नसेल तर काही अडचण येत नाही. तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव आणि जन्मतारीख मात्र द्यावीच लागेल. येथे तुम्हाला किती पैसे जमा आहेत हे कळले की तुम्ही एलआयसी शाखेशी संपर्क साधून आपले पैसे मिळवू शकता. (LIC has your money, but you don’t know; Find out your money online)

इतर बातम्या

Viral Video : भर मंडपात नवरीने डोळे मिचकावले, केला ‘असा’ इशारा की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

‘या’ सरकारी योजनेत 5000 गुंतवणुकीतून वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत व्हा करोडपती, कसा घ्याल फायदा?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.