LIC HOUSING FINANCE शेअर्समध्ये तेजी, बंपर परताव्याचा अंदाज; ब्रोकिंग फर्म्सचे ग्रीन सिग्नल
समाधानकारक कामगिरीमुळे गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एलआयसी हाउसिंगच्या तिमाही अंदाजात कंपनीच्या नफ्यात 180 टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. एलआयसी हाऊसिंग स्टॉक्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली गेली.
नवी दिल्ली- शेअर बाजारात तेजी-घसरणीचं सत्र सुरू आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील घसरणीमुळं मार्केट कॅप घसरली होती. आज आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात उसळी दिसून आली. शेअर बाजार स्थिरता-अस्थिरतेच्या काळात काही स्टॉक्सच्या (stocks) वाढीचा आलेख उंचावत राहिला आहे. आघाडीच्या ब्रोकिंग फर्मने वाढीचा अंदाज वर्तविलेल्या स्टॉक्समध्ये एलआयसी (LIC) हाउसिंग फायनान्स समावेश आहे.समाधानकारक कामगिरीमुळे गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एलआयसी हाउसिंगच्या तिमाही अंदाजात कंपनीच्या नफ्यात 180 टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. एलआयसी हाऊसिंग (Life Housing finance) स्टॉक्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली गेली. आजच्या व्यवहारादरम्यान स्टॉक 374 च्या टप्प्यावर पोहोचला. कंपनीच्या वाढीचा दर समाधानकारक असल्यामुळे 40 टक्के परताव्याची शक्यता ब्रोकिंग फर्मने वर्तविली आहे.
…तब्बल 180% नफा
एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या नफ्यात मार्च तिमाहित 180 टक्क्यांच्या वाढीसह 1,118.6 कोटी वर पोहोचला. गेल्या वर्षी कंपनीला 399 कोटींचा नफा झाला होता. मार्गेन स्टेनली ब्रोकिंग फर्मने स्टॉक्सचा समावेश अंडरवेट कॅटेगरीत केला आहे. गेल्या पाच सत्रात स्टॉक मध्ये 13 टक्के वाढ नोंदविली गेली. यादरम्यान केवळ एकदाच स्टॉक मध्ये घसरण झाली.
घसरणीचं मळभ हटलं:
जागतिक आर्थिक घडामोडींचा संमिश्र परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स व निफ्टी मध्ये मोठी तेजी नोंदविली गेली. सेन्सेक्स 1500 हून अधिक अंकाच्या वाढीसह बंद झाला. निफ्टीनं 16250 अंकांचा टप्पा पार केला. शेअर बाजारात आज (शुक्रवारी) चौफेर खरेदीच चित्र दिसून आलं. निफ्टी वर बँक आणि फायनान्शियल निर्देशांक 2.5 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. मेटल निर्देशांकात 4 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. फार्मा, एफएमसीजी आणि रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदीचा जोर राहिला. सेन्सेक्स 1534 अंकांच्या तेजीसह 54,326.39 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी 457 अंकांच्या वाढीसह 16266 च्या टप्प्यावर पोहोचला. सेन्सेक्स वरील 30 पैकी सर्व 30 शेअर्समध्ये तेजी नोंदविली गेली.