LIC IPO SUBSCRIPTION: आश्चर्यम्! एलआयसी आयपीओ 100% सबस्क्राईब, ‘ही’ कॅटेगरी टॉप?

| Updated on: May 06, 2022 | 12:16 AM

आयपीओला 16.2 कोटी इक्विटी शेअर्समध्ये ऑफर साईझच्या तुलनेत 16.68 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली मिळाली आहे. एलआयसी आयपीओला अपेक्षेप्रमाणं अधिकाधिक प्रतिसाद मिळाला आहे. येत्या 9 मे पर्यंत आयपीओ सबस्क्राईब (IPO Subscription) केले जाऊ शकते.

LIC IPO SUBSCRIPTION: आश्चर्यम्! एलआयसी आयपीओ 100% सबस्क्राईब, ‘ही’ कॅटेगरी टॉप?
Follow us on

नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life insurance corporation) आयपीओचा मार्केटमध्ये डंका आहे. आयपीओला सबस्क्राईब होण्याच्या दुसऱ्या दिवशी बंपर प्रतिसाद मिळाला आहे. देशातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ बोलीच्या दुसऱ्या दिवशी 1.03 पट सबस्क्राईब झाला आहे. आयपीओला 16.2 कोटी इक्विटी शेअर्समध्ये ऑफर साईझच्या तुलनेत 16.68 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली मिळाली आहे. एलआयसी आयपीओला अपेक्षेप्रमाणं अधिकाधिक प्रतिसाद मिळाला आहे. येत्या 9 मे पर्यंत आयपीओ सबस्क्राईब (IPO Subscription) केले जाऊ शकते. गुंतवणुकदार वीकेंडच्या दिवशी शनिवारी आणि रविवारच्या दिवशी आयपीओला विशेष सुविधेद्वारे सबस्क्राईब केले जाऊ शकते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओ बाबत केंद्र सरकार आणि गुंतवणूकदार बँकर्सची बैठकीच्या अनेक फेऱ्या सुरू होत्या. सरकारनं आयपीओच्या यशस्वीतेसाठी सर्वोपतरी पावलं उचलली आहेत.

आयपीओ सबस्क्रिप्शन स्थिती:

· पॉलिसीधारक कोटा- 3.01 पट

· रिटेल कोटा- 90 टक्के

· क्यूआयबी कोटा- 40 टक्के

· एनआयआय कोटा- 45 टक्के

अँकर इन्व्हेस्टरचा बंपर प्रतिसाद-

जागतिक गुंतवणुकदारांना आकर्षिक करण्यासाठी एलआयसीनं धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. दरम्यान, प्री-प्लेसमेंटच्या माध्यमातून एलआयसी आयपीओला अँकर इन्व्हेस्टरचा बंपर प्रतिसाद मिळाला आहे. अर्थक्षेत्रातील जाणकरांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी आयपीओत अँकर इन्व्हेस्टरने 7000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. एलआयसीनं जागतिक स्तरावरील अँकर इन्व्हेस्टरला निमंत्रण धाडली होती. त्यांच्या माध्यमातून 5630 कोटी रुपये उभारणीचे एलआयसीचं उद्दिष्ट होतं. अपेक्षेपेक्षा अधिक गुंतवणूक एलआयसीच्या खात्यात जमा झाली आहे. केंद्र सरकारने एलआयसी आयपीओ साठी 50-60 अँकर इन्व्हेस्टर्सची निवड केली होती.

 

आयपीओ अपडेट एका क्लिकवर-

• आयपीओच्या माध्यमातून सरकार एलआयसीतील 3.5 टक्के भागीदारी विकणार

• पॉलिसी धारकांना 60 रुपये आणि रिटेल आणि कर्मचाऱ्यांना 45 रुपयांचा डिस्काउंट

• आयपीओचा लॉट साईझ 15 शेअर्सचा

• एलआयसीने आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राईस ब्रँड निश्चित

• आयपीओच्या माध्यमातून 22 कोटींहून अधिक शेअर्सची विक्रीचं लक्ष्य

• अँकर गुंतवणुकदारांसाठी 5.9 कोटी, कर्मचाऱ्यांसाठी 15.8 लाख, पॉलिसीधारकांसाठी 2.2 कोटी शेअर