LIC च्या ‘या प्लॅन’ मधून दरमहा 9250 रुपये पेन्शन मिळवा, मॅच्युरिटीनंतर 15 लाखही मिळणार, वाचा सविस्तर

प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 15 लाखांची गुंतवणूक केल्यास पॉलिसीधारकाला दरमहा 9250 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. ( Pradhan Mantri Vaya Vandana Yojana PMVVY)

LIC च्या 'या प्लॅन' मधून दरमहा 9250 रुपये पेन्शन मिळवा, मॅच्युरिटीनंतर 15 लाखही मिळणार, वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 1:46 PM

नवी दिल्लीःकोरोना विषाणू संसर्गाच्या काळात लोकांना जीवन विम्याचं महत्व पटलेलं आहे. ज्या नागरिकांनी जीवन विमा काढला होता त्यांना याचा फायदा जालेला आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना जीवन विम्यामुळे मदत मिळत आहे. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही एलआयसीच्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेत (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) गुंतवणूक करू शकता. केंद्र सरकारची ही योजना एलआयसीच्या माध्यमातून चालविली जाते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा 9250 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. (LIC Pension Plan PMVVY scheme investor get Rs 9250 month pension and total cashback of 15 lakh after 10 years )

परतावा कधी मिळणार?

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा कालावधी 10 वर्षे आहे. पॉलिसीधारकाला 10 वर्षे पेन्शन तसेच पॉलिसीसाठी गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीवरील व्याजाव्यतिरिक्त एकरकमी रक्कमही परत केली जाईल. त्याच वेळी जर पॉलिसीधारकाचा गुंतवणुकीच्या कालावधीत मृत्यू झाला तर खरेदी किंमत नामनिर्देशित केलेल्या वारस व्यक्तीला परत केली जाईल.

पेन्शन किती असेल?

जर एखाद्या पॉलिसीधारकाला दरमहा 9,250 रुपये पेन्शन पाहिजे असेल, तर सुमारे 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्याच बरोबर जर तुम्हाला वार्षिक रक्कम पाहिजे असेल, तर तुम्हाला 1,11,000 रुपये मिळेल. त्याचबरोबर या योजनेत 5 लाख रुपयेल गुंतवल्यास वार्षिक आधारावर 4,1500 रुपयांच्या गुंतवणुकीवर 3333 रुपये पेन्शन देण्यात येईल. जर आपण 3 लाख रुपये जमा केले तर मासिक आधारावर आपल्याला पेन्शन 2000 रुपये मिळेल.

प्रधानमंत्री वय वंदना योजना कोणासाठी?

प्रधानमंत्री वय वंदना योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेतील गुंतवणुकीला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज देखील काढता येते. अर्जदार यामध्ये एकरकमी गुंतवणूक करू शकतात. यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर निवृत्तीवेतन घेता येते. PMVVY योजनेमध्ये मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

योजनेचे फायदे

>> प्रधानमंत्री वय वंदना योजनेत तुम्हाला कर्जाची सुविधा मिळते. तीन वर्षांसाठी पॉलिसी असणे आवश्यक आहे. यामध्ये जास्तीत जास्त कर्जाची रक्कम खरेदी किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत आहे. >> या योजनेत आयकर विभागाकडून करात सूट देण्यात आली आहे. >> या योजनेत तुम्हाला पेन्शनच मिळणार नाही, तर तुम्ही गुंतविलेले पैसे परत मिळतील. >> जर तुमचा जोडीदार किंवा आपण स्वत: गंभीर आजारी असाल तर आपण त्यातून पैसे घेऊ शकता. या प्रकरणात आपल्याला खरेदी किंमत फक्त 98% सरेंडर व्हॅल्यू म्हणून द्यावे लागेल.

गुंतवणूक प्रक्रिया

पंतप्रधान वय वंदना योजनेंतर्गत गुंतवणुकीसाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी आपण एलआयसीच्या वेबसाईटवरुन योजनेची माहिती मिळवू शकता. या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि येथे औपचारिकता पूर्ण करा. यावेळी अर्जदारास पॅनकार्डची झेरॉक्सप्रत, पत्त्याचा पुरावा (आधार, पासपोर्टची प्रत) आणि खातेदाराची पेन्शन असलेली बँक पासबुकची प्रत आवश्यक असेल.

संबंधित बातम्या:

LIC Pension Scheme: हरेक महिन्याला थेट 10 हजारांपर्यंत पेन्शन; मॅच्युरिटीवर व्याजासह मिळणार जबरदस्त फायदा

LIC च्या ‘या’ योजनेत 23000 पेन्शन मिळवण्यासाठी जमा करा 3 लाख, 10 वर्षांनंतर पैसेसुद्धा परत मिळणार

(LIC Pension Plan PMVVY scheme investor get Rs 9250 month pension and total cashback of 15 lakh after 10 years )

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.