विमा पॉलिसीचा भरायचाय हप्ता तर LIC च्या ऑफिसपर्यंत तगंडतोड कशाला ? UPI ने फटाफट पेमेंटचा मार्ग आहे ना !

देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा अर्थात एलआयसीच्या विमा पॉलिसीचा हप्ता भरण्याची डिजिटल सोय झाली आहे. युपीआय पेमेंटद्वारे ग्राहक अगदी काही क्षणात सहज आणि सोप्या पद्धतीने पॉलिसीची रक्कम अदा करु शकतो.

विमा पॉलिसीचा भरायचाय हप्ता तर LIC च्या ऑफिसपर्यंत तगंडतोड कशाला ? UPI ने फटाफट पेमेंटचा मार्ग आहे ना !
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 7:57 AM

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजे एलआयसी, भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाने (Life Insurance Corporation of India) विमाधारकांसाठी विशेष सुविधा सुरु केली आहे. ग्राहकांना विमा पॉलिसीचा हप्ता (Policy Premium) भरण्यासाठी एजंटकडे जाण्याची अथवा महामंडळाच्या कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. आधुनिक डिजिटल आयुधांचा वापर करत ग्राहकांना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने एलआयसीचा हप्ता जमा करता येईल. युपीआय पेमेंट (UPI Payment Method) पद्धतीने अगदी हातातील मोबाईलमधील अॅपने काही क्षणात ग्राहकाला हप्ता जमा करता येणार आहे. त्यामुळे भारतातील लाखो विमाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कंपनीच्या कार्यालयातील कामाचा ताणही कमी झाला आहे. घरबसल्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. यापूर्वी ऑनलाईन अथवा डेबिट वा क्रेडिट कार्ड द्वारे एलआयसीचा हप्ता जमा करता येत होता. आता गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone pe), पेटीएम (Paytm) या युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर करुन हप्त्याची रक्कम जमा करता येणार आहे.

युपीआयद्वारे एलआयसीचा भरा हप्ता

सर्वात अगोदर तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल पे अॅप उघडा. बिल सेक्शनचा पर्याय निवडा. फायनान्स आणि टॅक्सेसमध्ये विमा पर्याय निवडा. त्यात एलआयसीचा पर्याय शोधा आणि निवडा. त्यानंतर तुमची पॉलिसी लिंक करण्याचा पर्याय समोर येईल. याठिकाणी तुमच्या विमा पॉलिसीचा क्रमांक आणि ई-मेल आयडी त्याठिकाणी नोंद करा. त्यानंतर लिंक खात्यावर क्लिक करा. याठिकाणी तुमच्या पॉलिसीचे विवरण समोर येईल. त्याचा पडताळा करा. पॉलिसी यशस्वतीने लिंक झाली की तुमच्या हप्त्याची रक्कम समोर येईल. ती ऑनलाईन पद्धतीने युपीआय पिन टाकून हप्त्याची रक्कम जमा करा. तुमच्या खात्यातील रक्कम एलआयसीकडे वळती होऊन एलआयसीकडून तुम्हाला विमा हप्ता जमा झाल्याची पावती ई-मेलवर येते. तसेच मोबाईलवर मॅसेजही दाखल होतो.

पेटीएम या अॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे. बिल सेक्शननंतर एलआयसीचा पर्याय निवडा. त्यात पे इन्शुरन्स प्रिमियम हा पर्याय निवडा. त्याठिकाणी पॉलिसी लिंक केली, विवरण तपासले की पुढील पायरी म्हणजे युपीआय पेमेंट पिन टाकून हप्त्याची रक्कम चुकती करायची.

तर फोन पे या अॅपवर ही एलआयसी विमाधारकाला ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. अवघ्या काही सेकंदात तुम्हाला एलआयसीचा हप्ता जमा करता येतो. रिचार्ज आणि बिल पेमेंट या विभागात जाऊन Financial Services and taxes या विभागात एलआयसी हा पर्याय निवडा. याठिकाणी तुमच्या पॉलिसीचे विवरण समोर येईल. त्याचा पडताळा करा. पॉलिसी यशस्वतीने लिंक झाली की तुमच्या हप्त्याची रक्कम समोर येईल. ती ऑनलाईन पद्धतीने युपीआय पिन टाकून हप्त्याची रक्कम जमा करा. तुमच्या खात्यातील रक्कम एलआयसीकडे वळती होऊन एलआयसीकडून तुम्हाला विमा हप्ता जमा झाल्याची पावती ई-मेलवर येते. तसेच मोबाईलवर मॅसेजही प्राप्त होईल.

Petrol, diesel price: इंधनाचे भाव कसे कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितला उपाय

today Petrol diesel rate : सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, मात्र एक्साइज ड्यूटी कमी होणार नसल्याचे संकेत

विमा पॉलिसी खरेदी करून फसला आहात; नको असलेल्या पॉलिसीमधून अशी करा आपली सुटका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.