LIC Shares Update: एलआयसीची सुमार कामगिरी; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका, तज्ज्ञ काय म्हणतात?

एलआयसीच्या शेअर्सची सुमार कामगिरी सुरूच आहे. आतापर्यंत या शेअर्समधून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने अनेकांनी शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती.

LIC Shares Update: एलआयसीची सुमार कामगिरी; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका, तज्ज्ञ काय म्हणतात?
एलआयसी आयपीओ Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 1:22 PM

मुंबई : एलआयसीच्या शेअर्सची (LIC Shares) सुमार कामगिरी सुरूच आहे. गेल्या आठवड्यात एलआयसीच्या (LIC) शेअर्समध्ये मोठी पडझड पहायला मिळाली. विमाधारक आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना शेअर्स खरेदीमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक (Investment) केली. मात्र पहिल्याच दिवशी हा शेअर 867 रुपयांना सूचिबद्ध झाल्याने गुंतवणूकदारांना पहिला फटका बसला आहे. या शेअर्सची इश्यू प्राईस 949 रुपेय निश्चित करण्यात आली. परंतु पहिल्याच दिवशी या शेअर्समध्ये आठ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मोठा गाजावाजा करत शेअर बाजारात उतरलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडाळाच्या या शेअर्सने गुंतवणूकदारांना तगडा झटका दिला. एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे गेल्या आठवडाभरात तब्बल 77 हजार 600 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

घसरण सुरूच

एलआयसीचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून सातत्याने या शेअरमध्ये घसरण सुरूच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाली आहे. हा प्रश्न केवळ एकट्या एलआयसीचा नाही तर सध्या संपूर्ण शेअर मार्केटमध्येच मोठी पडझड दिसून येत आहे. शुक्रवारी शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. मात्र या तेजीत देखील एलआयसीचा शेअर्स स्थिर होता. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एलआयसीचा शेअर्स 826.05 अकांवर स्थिरावला म्हणजे इश्यू प्राईसच्या तुलनेत सध्या या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

पाचवे स्थान गमावले

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ओळख असलेली एलआयसी ही मार्केट कॅपमधील देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी होती. मात्र शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीमुळे एलआयसीला तब्बल 77,639.06 कोटी रुपयांचा फटका बसल्याने एलआयसीने आपले पाचवे स्थान देखील गमावले आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांनी काय करावे?

एलआयसीच्या शेअर्समधून मोठा परतावा मिळू शकतो, या अशेने अनेकांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले होते. मात्र सध्या तरी त्यांच्या पदरी निराशाच येताना दिसून येत आहे. सध्या एलआयसीच्या शेअर्समध्ये पडझड सुरू आहे. ही पडझड आणखी काही दिवस कायम राहू शकते. एलआयसीमध्ये लॉंगटर्म जे गुंतवणूक करतील त्यांचा फायदा होण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसेच ज्यांना लॉंगटाईम गुंतवणूक करणे शक्य नाही त्यांनी एलआयसीमधील आपली गुंतवणूक कमी करावी असा सल्ला देखील या क्षेत्रातील तज्ज्ञाकडून देण्यात येत आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....