नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) विमाधारकांसाठी (Policyholders) अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. बदलत्या काळानुरुप एलआयसीमध्ये बदल झाले आहेत. नवनवीन तंत्रज्ञाना आधारे एलआयसीने ग्राहकांना अनेक सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे एलआयसी कार्यालयातील लाबंच लांब रांगा आणि गर्दी बऱ्यापैकी कमी झाली आहे. आता तर ऑनलाईन (Online Services) मंत्र जपत एलआयसीने आधुनिक तंत्राचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या हातातील मोबाईलमधून सहजरित्या अनेक सेवांचा लाभ घेता येईल.
भारतीय जीवन विमा महामंडळाने आता सेवा पुरविण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर सुरु केला आहे. विमाधारकांना काही सेवा व्हॉट्सअपच्या मदतीने मिळतील. त्यांना त्याचा लाभ घेता येईल. ही सेवा प्राप्त करण्यासाठी अगोदर त्यांच्या विमा पॉलिसीची माहिती नोंदवावी लागेल.
व्हॉट्सअपवरील सेवांचा फायदा घेण्यासाठी विमाधारकांना एलआयसीच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल www.licindia.in वर त्यांच्या पॉलिसीचा तपशील नोंदवावा लागेल. याठिकाणी विमा पॉलिसीची नोंद केल्यानंतर विमाधारकाला व्हॉट्सअपवर काही सेवा मिळतील.
विमाधारकाला किती प्रिमियम बाकी आहे. त्याच्या बोनसची माहिती, पॉलिसीची सध्यस्थिती, त्याला कर्ज मिळेल की नाही, कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया याची माहिती घेता येईल. तसेच कर्जावरील थकीत व्याज, प्रिमियम पेड प्रमाणपत्र, ULIP पॉलिसीची सध्यस्थिती, तसेच इतर सेवांची माहिती घेता येईल.
व्हाट्सअपवर एलआयसीच्या सेवा प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विमाधारकांना सर्वात अगोदर 8976862090 या क्रमांकावर ‘Hi’ टाईप करुन पाठवावे लागेल. त्यानंतर लागलीच एक ड्रॉपडाऊन लिस्ट समोर येईल. त्यात ग्राहकांना 11 पर्यांय मिळतील.
या 11 पर्यांय पैकी एखादा पर्याय ग्राहकांना निवडावा लागेल. ग्राहकांना पर्याय क्रमांक टाकून त्याला प्रतित्युर द्यावे लागेल. त्याआधारे पुढील सेवा त्यांना प्राप्त करता येईल. त्यांना त्यांच्या पर्यायानुसार सेवा मिळतील.त्यांना एलआयसीचा प्रिमियम कधी आणि किती भरायचा आहे, याची माहिती मिळेल.
एक गोष्ट निश्चित आहे की, LIC ची सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला एलआयसीकडे नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावरुनच व्हाट्सअपसाठी मॅसेज पाठावायचा आहे. जर तुम्ही नोंदणीकृत नसाल तर पॉलिसी रजिस्टर करण्यासाठी एलआयसीच्या पोर्टलवर जावे लागेल.