LIC Jeevan Shiromani Plan | एलआयसीचा धाकड प्लॅन, तगड्या गुंतवणुकीवर 4 वर्षात 1 कोटी मिळणार, प्लॅनच आहे जीवन शिरोमणी!

LIC Jeevan Shiromani Plan | एलआयसीच्या अनेक जबरदस्त योजना आहेत. त्यातील एक योजना म्हणजे जीवन शिरोमणी, या योजनेत गुंतवणुकीवर एक कोटींचा परतावा तर मिळतोच,पण करातूनही सवलत मिळते.

LIC Jeevan Shiromani Plan | एलआयसीचा धाकड प्लॅन, तगड्या गुंतवणुकीवर 4 वर्षात 1 कोटी मिळणार, प्लॅनच आहे जीवन शिरोमणी!
एलआयसीचा धाकड प्लॅनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 11:39 AM

LIC Jeevan Shiromani Plan | तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल आणि गुंतवणुकीवर तगडा परतावा हवा असेल तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) सर्वात चांगला प्लॅन जीवन शिरोमणी हा आहे. एलआयसीच्या अनेक जबरदस्त योजना आहेत. त्यात शिरोमणी योजना (Jeevan Shiromani Plan)म्हणजे जीवन शिरोमणी. या योजनेत तगडी गुंतवणूक(Investment) तुम्हाला चार वर्षांनंतर एक कोटी रुपये मिळवून देईल. एवढेच नाही तर गुंतवणूकदारांना करातूनही दिलासा मिळणार आहे. या योजनेत केवळ 4 वर्ष गुंतवणूक करावी लागेल, तर मॅच्युरिटीवर (maturity) तुम्हाला एक कोटी रुपयांचा जबरदस्त फायदा होईल. योजनेत पॉलिसीधारकांना वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक तत्त्वावर प्रीमियम जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या योजनेत कर्जही मिळते. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे योजनेच्या कालावधीत ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या आधारे कर्जही देते. परंतु कर्ज घेण्यासाठी एलआयसीच्या अटी व शर्तींचे पालन करावे लागते. संपूर्ण योजना समजून घेऊयात .

काय आहे एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी (LIC Jeevan Shiromani)

एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी ही एक नॉन लिंक्ड(non linked) वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. ही मनी बॅक लाइफ इन्शुरन्स योजना (life insurance savings plan)आहे. या योजनेतंर्गत हमी दराने (Guaranteed Editions) रक्कम मिळते. ही योजना गंभीर आजारांपासूनही संरक्षण देते. एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी मुदतीच्या काळात विमाधारकाच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूनंतर आर्थिक मदत देते. या योजनेत विमाधारकांना वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक तत्त्वावर प्रीमियम म्हणजेच हप्ता जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही पॉलिसी खरेदी करण्याचे किमान वय 18 वर्षे आहे.

हे सुद्धा वाचा

कर्ज घेण्याची सुविधा

एलआयसीच्या या योजनेत गुंतवणुकीवर करसवलत मिळते. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे योजनेच्या कालावधीत ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या आधारे कर्जही देते. परंतु कर्ज घेण्यासाठी एलआयसीच्या अटी व शर्तींचे पालन करावे लागते. वेळोवेळी ठरवल्या जाणाऱ्या व्याजदराच्या आधारे पॉलिसीवर कर्ज देण्यात येते.

एलआयसी जीवन शिरोमणी बद्दल संपूर्ण माहिती

किमान विमा रक्कम : 1 कोटी रु. जास्तीत जास्त विमा रक्कम : कोणतीही मर्यादा (बेसिक सम अॅश्युअर्ड 5 लाख रुपयांच्या पटीत असेल) पॉलिसी टर्म : 14, 16, 18 आणि 20 वर्षे प्रवेशाचे किमान वय : 18 वर्षे

प्रीमियम किती काळ जमा करावा लागेल: 4 वर्षे पॉलिसीमध्ये प्रवेश करण्याचे कमाल वय : 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे, 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे, 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे, 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45वर्षे

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.