विमाधारकांना सणासुदीत मोठे गिफ्ट; अवघ्या 3 तासात क्लेम सेटलमेंट; सात दिवसात तर पेमेंट

Insurance Sector Update : विमा नियामक IRDAI ने आरोग्य आणि जीवन विमाधारकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यासाठी गणेशोत्सवापूर्वीच मोठी आनंदवार्ता आली आहे. विमाधारकांचा हिताचा विचार करता विमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहे. काय आहेत हे निर्देश, काय होणार फायदा?

विमाधारकांना सणासुदीत मोठे गिफ्ट; अवघ्या 3 तासात क्लेम सेटलमेंट; सात दिवसात तर पेमेंट
आरोग्य आणि जीवन विमा क्षेत्रात मोठा बदल
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 10:11 AM

आरोग्य आणि जीवन विमा क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून बदलांची नांदी सुरु आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल सुरु आहेत. डिजिटलायझेशनची किमया साधत विमाधारकांना कंपन्यांच्या जाचातून आणि फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) महत्वाचे निर्देश दिले आहेत. सणासुदीच्या काळात विमाधारकांना आयआरडीएआयने मोठा दिलासा दिला आहे. जीवन आणि आरोग्य विम्यात अवघ्या 3 तासात क्लेम सेटलमेंट आणि सात दिवसात पेमेंट देण्याचे निर्देश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत.

विमा कंपन्यांनी देय तारखेच्या किमान एक महिना आधी प्रिमियम देय तारीख आणि पॉलिसी पेमेंट संबंधीची माहिती पाठवणे आवश्यक आहे. जर कंपन्यांनी त्यात कुचराई केली तर ग्राहकांनी लोकपालाकडे तक्रार करावी असे IRDAI ने स्पष्ट केले आहे. आरोग्य विमा क्षेत्रात कॅशलेस सेटलमेंट आणि फ्री लूक पीरियड संबंधी विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

फ्री लूक पीरियडचा कालावधी वाढवा

हे सुद्धा वाचा

IRDAI ने विमा कंपन्यांना महत्वाची सूचना केली आहे. त्यानुसार आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीसाठी 30 दिवसांचा फ्री लूक कालावधी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. फ्री-लूक कॅन्सलेशन केल्यावर ग्राहकांना 7 दिवसांत प्रीमियम रक्कम रिफंड करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पॉलिसी कर्ज आणि मूळ पॉलिसीतील नियम आणि अटीतील बदल पण सात दिवसांच्या आत होण्याची वकिली करण्यात आली आहे.

3 तासात कॅशलेस क्लेम सेटलमेंट

आरोग्य विमाबाबत IRDAI ने महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार कॅशलेस क्लेमची सेटलमेंट 3 तासांच्या आता व्हायला हवी. याशिवाय IRDAI ने मास्टर सर्कुलरमध्ये ग्राहकांना विमा संबंधीची सर्व माहिती सविस्तर पाठवण्याची सूचना केली आहेर. ही माहिती स्थानिक भाषेत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमा कंपन्यांनी देय तारखेच्या किमान एक महिना आधी प्रिमियम देय तारीख आणि पॉलिसी पेमेंट संबंधीची माहिती पाठवणे आवश्यक आहे. जर कंपन्यांनी त्यात कुचराई केली तर ग्राहकांनी लोकपालाकडे तक्रार करावी असे IRDAI ने स्पष्ट केले आहे. आरोग्य विमा क्षेत्रात कॅशलेस सेटलमेंट आणि फ्री लूक पीरियड संबंधी विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.