Life Insurance Expensive : जीवन विमा महागणार, मग आता काय करणार

Life Insurance Expensive : जर तुम्ही पहिल्यांदाच विमा पॉलिसी खरेदी करणार असाल अथवा विमा पॉलिसीत अजून फिचर वाढवून घेणार असाल तर आता उशीर करु नका. कारण जीवन विमा लवकरच महागणार आहे.

Life Insurance Expensive : जीवन विमा महागणार, मग आता काय करणार
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 11:59 AM

नवी दिल्ली : संकटाच्या, अडचणीवेळी जीवन विमा (Life Insurance) कामी येतो. जवीन विम्यामुळे कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत मिळते. संकटाच्या वेळी ही रक्कम उपयोगी पडते. जीवन विमा खरेदी केल्यानंतर व्यक्ती केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला विम्याचे आर्थिक कवच खरेदी (Life Insurance Coverage) करत असते. जर तुम्ही पहिल्यांदाच विमा पॉलिसी खरेदी करणार असाल अथवा विमा पॉलिसीत अजून फिचर वाढवून घेणार असाल तर आता उशीर करु नका. कारण जीवन विमा लवकरच महागणार आहे. तुमचा पुढील हप्ता (Premium) आता वाढणार आहे.

जीवन विम्याचा हप्ता प्रत्येक वयोवर्गासाठी बदलत असतो. तुमच्या वयोनुसार प्रीमियममध्ये फरक दिसून येतो. आता मात्र प्रत्येक वयातील विमाधारकासाठी हप्त्यात बदल होणार आहे. हा हप्ता आता महागणार आहे. आता या बदलाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. पूर्वीपेक्षा अधिक रक्कम विमा खरेदी लागणार आहे. विम्याचा हप्ता पूर्वीपेक्षा अधिक असेल.

जीवन विम्याचा हप्ता साधारणपणे विमाधारकाच्या आयुर्मानाच्या (life expectancies)आधारावर ठरवला जातो. परंतु, कोविड काळात या नियमाला अपवाद देण्यात आला. कोविड काळात पटापट विम्याचे दावे निकाली काढण्यात आले. केंद्र सरकारही त्यासाठी आग्रही होते. विमा कंपन्यांनीही दावे पटकन निकाली काढले. या क्लेममुळे विमा कंपनीला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे. दाव्यांनी विमा कंपन्यांचे दिवाळे निघाले आहे. परिणामी आता कंपन्यांनी जीवन विमा पॉलिसी महाग करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

मोठ्या प्रमाणात आजही कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह सारख्या आजारांन आमंत्रण मिळत आहे. आरोग्याबाबत काळजी वाढली आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. आरोग्य ढासळणे, धूम्रपान, दारुचे सेवन या गोष्टींमुळे आरोग्य विमा महागणार आहे.

कमी वयात विमा पॉलिसी खरेदी करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. कमी वयात विमा पॉलिसी खरेदी केल्यास, तुमचा मोठा खर्च कमी वाचेल. वाढत्या वयात विमा पॉलिसी खरेदी कराल, तर त्याचा मोठा हप्ता येईल आणि मासिक बजेटवर त्याचा परिणाम होईल. कधी कधी पैसे वाचवण्यासाठी स्वस्तात विमा खरेदी करण्यात येतो. पण नंतर हा विमा फारसा फायदेशीर नसल्याचे कळते, पण विम्याचे फिचर वाढविल्यास तो महाग होईल.

  1. जर तुम्हाला सध्याच्या जीवन विमा तुम्हाला वाढवायचा नसेल तर चिंता करायचे नाही. तुमचा नियमीत हप्ता तुम्ही जमा करा. त्यात उशीर केल्यास दंडाची रक्कम भरावी लागेल.
  2. जर तुम्ही विमाधारक असाल आणि विमा पॉलिसीत बदल अथवा त्याचे फिचर वाढविण्याचा तुमचा विचार असेल तर मात्र तुम्हाला घाई करावी लागेल. कारण लवकरच विमा महागणार आहे. त्यापूर्वीच सध्याच्या किंमतीनुसार फिचर वाढवावे लागतील.
  3. जर तुम्ही आतापर्यंत विमा पॉलिसी खरेदी केली नसेल तर, तुम्हाला लगेचच जीवन विमा खरेदी करणे आवश्यक आहे. तरच सध्याच्या दरानुसार तुम्हाला विमा पॉलिसी मिळले. उशीर केल्यास जीवन विमा महाग मिळेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.