Lijjat Papad : सात महिलांनी अवघ्या 40 रुपयांत सुरु केला गृहउद्योग,आज 1600 कोटींची कमाई

घराच्या गच्चीवर सात गृहीणींनी लिज्जत पापडाच्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली, आज लिज्जत पापड जगातील 25 देशात निर्यात होतो. लाखो महिलांना त्यातून रोजगार मिळत आहे.

Lijjat Papad : सात महिलांनी अवघ्या 40 रुपयांत सुरु केला गृहउद्योग,आज 1600 कोटींची कमाई
lijjat-papadImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 8:07 PM

मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : जेव्हा महिलांना जेव्हा घरातील जबाबदारी पाहावी आणि पुरुषांनी नोकरी किंवा व्यवसाय करावा अशा काळात सात गुजराथी महिलांनी साल 1959 मध्ये एकत्र येऊन सुरु केलेल्या पापडाच्या गृहउद्योगाने इतिहास घडविला आणि जगभरात पापडाचा हा चविष्ठ ब्रॅंड पसरला. पापडासारख्या भारतीय अन्नपदार्थाने ब्रेक फास्ट आणि जेवणाची लज्जत वाढविण्यास हातभार लावला नाही. आज लिज्जत पापडाची जगभरात विक्री केली जाते. कोण होत्या या सात महिला ज्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी सुरु केलेला हा गृहउद्योग आज फास्ट मुव्हींग कंझ्युमर गुड प्रोडक्ट बनला आहे.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडाचा व्यवसायाचा पसार मोठा झाला आहे. मात्र त्याची सुरुवात अगदी छोट्या बजेटमध्ये अवघ्या चाळीस रुपयातून झाली होती. मुंबईतील जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उमजाबेन नरनदास कुंडालिया, भानूबेन एन.टण्णा, लागूबेन अमृतलाल गोकणी, जयाबेन व्ही. विथालानी आणि दिवालीबेन लुक्का या सात महिलांनी हा व्यवसाय सुरु केला. त्यांनी एकत्र येत लावलेले रोपट्याचे रुपांतर आज लाखो महिलांना रोजगार देणाऱ्या वटवृक्षात झाले आहे.

गच्चीवर पापडाचा व्यवसाय सुरु

15 मार्च 1959 मध्ये या सात मैत्रिणी गच्चीवर पापड वाळत टाकत असताना त्यांना पापड विक्रीचा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. त्यांनी चार पाकिटे पापड बनविले. सुरुवातीला त्यांनी या पापडाची विक्री करण्यासाठी भुलेश्वर येथील प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांना हे पापड विकण्यासाठी सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला तोटा झाला तरी त्यांनी कोणाकडून भांडवल किंवा मदत घेतली नाही. परंतू तिनच महिन्यात 25 महिलांनी पापड लाटण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भांडी, कॅबिनेट्स, स्टोव्ह आणि व्यवसायाला लागणारे साहित्य विकत घेतले. अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय हळुहळु वाढू लागला.

25 देशात लिज्जतची उत्पादने

1968 मध्ये महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातच्या वालोड येथे त्यांनी पहिली शाखा उघडली. लिज्जतने पापडात यश आल्यानंतर खाकरा, मसाला पापड, वडी, गहु आटा आणि इतरही बेकरी उत्पादने सुरु केली. 1970 मध्ये लिज्जतने पिठाची गिरणी सुरु केली. अगरबत्ती व्यवसाय सुरु केला. जवळपास 45 हजार महिला कर्मचारी 4.8 अब्ज पापडाची निर्मिती सुरु केली. लिज्जतच्या 17 राज्यात 82 शाखा आहेत. अमेरिका, जपान ते साऊथ आफ्रिका अशा 25 देशात लिज्जतची उत्पादने निर्यात केली जातात. उद्योजिका जसवंतीबेन जमनादास पोपट यांना भारत सरकारने पद्श्रीने गौरविले आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.