आधार क्रमांक बँक अकाऊंटला लिंक करा, अन्यथा पेंशन आणि एलपीजी सबसिडी होईल बंद

आधार क्रमांक बँक अकाऊंटला लिंक करा, अन्यथा पेंशन आणि एलपीजी सबसिडी होईल बंद (Link Aadhar card to bank account for pension and LPG subsidy)

आधार क्रमांक बँक अकाऊंटला लिंक करा, अन्यथा पेंशन आणि एलपीजी सबसिडी होईल बंद
आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक करा
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 6:20 PM

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ज्या ग्राहकांना सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी बँक अकाऊंटला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे, असे एसबीआयने म्हटले आहे. या योजनांमध्ये पेन्शन आणि एलपीजी महत्वाचे आहे. त्यामुळे या दोन योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आणि बँक खाते लवकरात लवकर लिंक करणे गरजेचे आहे. स्टेट बँक आपल्या पोर्टलवर ऑनलाईन आधार क्रमांक लिंक करण्याची अत्यंत सोप्या पद्धतीत माहिती देण्यात आली आहे. यामुळे आधार क्रमांक लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या तुम्ही हे काम करु शकता. (Link Aadhar card to bank account for pension and LPG subsidy)

SBI बँकिंग पोर्टलवरुन आधार जोडा

बँक अकाऊंटला आधार जोडण्यासाठी स्टेट बँक तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध करुन देते. तुमच्या सोयीनुसार कोणत्याही एका माध्यमाचा वापर करुन तुम्ही आधार आणि बँक खाते सहज लिंक करु शकता.

या वेबसाईटच्या माध्यमातून जोडा आधार

आधार लिंक करण्यासाठी तुम्ही bank.sbi किंवा www.sbi.co.in वर जा आणि नमूद केलेल्या सूचनांचे अनुसरण करा. या दोनपैकी एका लिंकवर Link your Aadhar Number with your Bank असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी आपल्याला काही सूचना लिहिलेल्या दिसतील त्याचे अनुसरण करा. मॅपिंगबाबत तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर माहिती दिली जाते.

SBI इंटरनेट बँकिंग पोर्टलचा वापर करु शकता

-www.onlinesbi.com वर लॉग इन करा – स्क्रीनच्या डाव्या बाजूला My Accounts लिहिले असेल. त्यावर Link your Aadhar number वर जा – पुढच्या पेजवर अकाऊंट नंबर निवडा, आता आधार क्रमांक टाका आणि सबमिट वर क्लिक करा – तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाचे अंतिम दोन अंक दिसतील – मॅपिंगच्या स्थितिची माहिती तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकवर दिली जाईल

SBI एनीवेयर अॅपच्या माध्यमातून जोडा आधार

– एसबीआय एनीवेयर अॅपवर लॉग इन करा – येथे Request लिहिले असेल, त्यावर क्लिक करा -‘Aadhar’ वर क्लिक करा -‘Aadhar Linking’ वर क्लिक करा – आता ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये तुमचा सीआयएफ निवडा – येथे तुमचा आधार क्रमांक नमूद करा – नियम आणि अटी वर क्लिक करा आणि सबमिट करा – आधार नोंदणीनंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस येईल

SBI एटीएममार्फत आधार जोडा

– एसबीआय एटीएममध्ये जा – तुमचे एटीएम कार्ड स्वाईप करा -‘Service-registration’ वर क्लि करा – येथे तुमचा Aadhar registration किंवा तुमच्या गरजेनुसार Inquiry निवडा – तुमचे खाते बचत आहे चेकिंग ते निवडा. यातनंर तुम्हाला आधार क्रमांक नमूद करावे लागेल – दुसऱ्यांदा तोच आधार क्रमांक नमूद करण्यास सांगण्यात येईल – आधार नोंदणीनंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक मॅसेज येईल

SBI ब्रँचमधून जोडू शकता आधार

– तुमच्या जवळच्या एसबीआय शाखेत जा – सोबत आधार क्रमांक किंवा ई-आधारची कॉपी घेऊन जा – ब्राँचमधून फॉर्म घ्या आणि भरा – फॉर्मला आधार कॉपी जोडा – आवश्यक व्हेरीफिकेशननंतर तुमच्या खात्याला आधार क्रमांक जोडले जाईल – आधार नोंदणी होताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मॅसेज येईल

आजकाल मोठ्या प्रमाणात होत असलेल्या फसवणुकीच्या घटना पाहता आधार लिंक करणे गरजेचे बनले आहे. बँकेच्या केवायसीमध्ये आधार जरूरी आहे, यात ग्राहकांची माहिती मिळते. ग्राहकांकडून बँकेची फसवणूक होऊ नये यासाठी आधारची माहिती अनिवार्य करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आधारची माहिती अनिवार्य असणाऱ्या अनेक योजना सरकार राबवत आहे. बँक खात्यात थेट पैसे यावे यासाठी सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) सुरु केले आहे. यासाठी बँक खात्याला आधार जोडणे गरजेचे आहे. (Link Aadhar card to bank account for pension and LPG subsidy)

संबंधित बातम्या

Paytm चं गिफ्ट; फक्त 10 रुपये फी भरून करा शेअर बाजारात गुंतवणूक

Gold Price Today: 717 रुपयांनी स्वस्त झालेलं सोने पुन्हा एकदा महागले; जाणून घ्या तोळ्याचा भाव

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.