आधार नंबर बँक खात्याशी लिंक करा आणि निश्चिंत राहा, बँक खात्याचा गैरव्यवहार रोखण्यास होईल मदत

जर तुम्ही अजूनही तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर वेळीच लिंक करून घ्या. तसेच जर तुम्ही बँक खाते आधार कार्डशी लिंक केले असेल तर हेही लक्षात घ्या की तुमच्या आधार कार्डला किती बँक खाती जोडलेली आहेत. (Link the Aadhaar number to the bank account and rest assured, it will help prevent bank account fraud)

आधार नंबर बँक खात्याशी लिंक करा आणि निश्चिंत राहा, बँक खात्याचा गैरव्यवहार रोखण्यास होईल मदत
Aadhaar card
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 12:38 AM

नवी दिल्ली : बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागरिकांना आपल्या बँक खात्यात विविध सरकारी योजनांच्या अनुदानाचा अर्थात सबसिडीचा तसेच इतर सुविधांचा लाभ घेता येतो. कुठल्याही सरकारी योजनेच्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याल आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यकच आहे. गॅसची सबसिडी घेण्यासाठीही आधार आणि बँक खाते लिंक करण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही अजूनही तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर वेळीच लिंक करून घ्या. तसेच जर तुम्ही बँक खाते आधार कार्डशी लिंक केले असेल तर हेही लक्षात घ्या की तुमच्या आधार कार्डला किती बँक खाती जोडलेली आहेत. (Link the Aadhaar number to the bank account and rest assured, it will help prevent bank account fraud)

विविध बँकांमध्ये आपली खाती असू शकतात. ही सर्व खाती तुमच्या एकाच आधार कार्डशी जोडलेली असतात. त्यामुळे तुम्ही आधार कार्डच्या नंबरवरून तुमची सर्व बँक खाती लिंक केलेली आहेत की नाही, याची खातरजमा करून घ्या. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. अलिकडच्या काळात ऑनलाईन घोटाळ्यांची प्रकरणे वाढली आहेत. छोटीशी जरी वैयक्तीक माहिती हाती लागली तरी घोटाळेखोर त्याचा गैरलाभ उठवतात. ऑनलाईनच्या विश्वात घोटाळ्यांच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अनेकदा अशीही प्रकरणे समोर येतात, ज्या प्रकरणांमध्ये कुणाच्या एका खात्यावर दुसऱ्याचे बनावट खाते चालवले जात आहे. अशा बनावट खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहारही घडले जाऊ शकतात. त्यामुळेच अशा प्रकारचे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार कार्ड नंबरशी किती बँक खाती लिंक आहेत, हे तपासणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कोणत्याही बँक खात्याशी संबंधित गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आले तर तत्काळ सायबर क्राईम ब्रँचला कळवा.

आधारच्या वेबसाईटला भेट द्या

आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यांची माहिती तुम्ही आधारच्या वेबसाईटला भेट देऊन मिळवू शकता. तुम्हाला युआयडीएआयच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. स्टेटस चेक करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडने (एनपीसीएल) पूर्ण मशिनरी तयार केली आहे. याच माध्यमातून तुम्ही बँक खात्यांशी आधार लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता. याची माहिती तुम्हाला मोबाईलवरही मिळू शकेल. कारण आधार आणि बँक खात्यासोबत मोबाईल नंबरही नोंदणी केलेला असतो.

चेक कसे कराल?

आपल्या आधार कार्डला किती बँक खाते जोडली गेलेली आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही https://resident.uidai.gov.in/bank-mapper या वेबसाईटला भेट देऊ शकता. या क्लिक करा आणि आवश्यक ती माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. आपल्या आधार कार्ड नंबरचा गैरवापर होऊ नये, त्या नंबरवर कोणतेही बनावट खाते खोलले जाऊ नये, यासाठी यूआयडीएआयकडून आधार नंबर लॉक करण्याची व्यवस्था दिली जाते. तुम्हाला आवश्यकता असेल, त्यावेळी तुम्ही आधार अनलॉक करू शकता. यामुळे तुमची बनावट खाती बनण्याचा धोका टळू शकेल.

आधार-बँक खाते स्टेटस तपासा

सर्वात आधी तुम्ही युआयडीएआय डॉट इन या वेबसाईटवर जा. येथे ‘माय आधार’ सेक्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हिसेज सेक्शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडले जाईल. त्यावर तुम्हाला युआयडी किंवा व्हीआयडी क्रमांक विचारला जाईल. तेथे सिक्योरिटी कोडदेखील टाकावा लागेल. तसेच कॅप्चा कोड भरावा लागेल. ही सर्व माहिती दिल्यानंतर वन टाइम पासवर्ड अर्थात ओटीपीवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लगेचच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा कोड युआयडीएआय ओटीपी कंट्रोलमध्ये टाकून सबमिट बटण दाबा. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असेल, तर तुम्हाला एक मेसेज दिसेल. जर तुम्हाला मेसेज दिसत नसेल तर तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन आधार कार्ड खात्याशी लिंक करावे लागेल. ऑनलाईन गैरव्यवहार रोखण्यासाठी तुम्हाला आधार नंबर आणि बँक खाते लिंक करावेच लागेल. (Link the Aadhaar number to the bank account and rest assured, it will help prevent bank account fraud)

इतर बातम्या

“वरळी-शिवडी कनेक्टर, प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टर प्रकल्प मुंबईच्या विकासात महत्त्वाचे”

अखेर ‘त्या’ विधानावरून आदित्य नारायणनं मागितली अलिबागकरांची माफी

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.