Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रो सिटीच्या तुलनेत कमी विकसित भागात मद्यविक्रीत वाढ, किंमती वाढूनही वर्षभरात खपाचा विक्रम

राज्य सरकारने जर बियरवरील कर कमी केला तर मुंबई-ठाणे, नाशिक आणि पुणे विभागातील मद्यविक्रीत देखील मोठी वाढ होईल असे अबकारी खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मेट्रो सिटीच्या तुलनेत कमी विकसित भागात मद्यविक्रीत वाढ, किंमती वाढूनही वर्षभरात खपाचा विक्रम
LIQUOR Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 6:33 PM

मुंबई : राज्यात मद्यविक्रीत ( Liquor sales ) प्रचंड वाढ झाली असून एका वर्षांत मद्यविक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 आणि 2022-23 मध्ये मद्याच्या विक्रीत तब्बल 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विदेशी तसेच देशी बियर आणि वाईन अशा मद्याच्या किंमतीत वाढ होऊनही गेल्या काही दशकापेक्षा महाराष्ट्रात मद्य विक्रीने रेकॉर्डब्रेक केला असून त्यामुळे राज्याच्या गंगाजळीत त्यामुळे मोठी भरच पडली आहे.

तिजोरीत 21,550 कोटीची भर

मद्यविक्रीत महाराष्ट्राने रेकॉर्डब्रेक केला आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षांत अबकारी करातून राज्याच्या तिजोरीत 21,550 कोटी रूपयांची भर पडली आहे. महसूलात झालेली ही वाढ 25 टक्के आहे. बियर आणि वाईनच्या विक्रीतही वाढ झाली आहे. राज्याने मद्य धोरणातील उदारीकरणाने कर कमी केल्याने राज्यााला मद्यविक्रीत अधिक फायदा झाला असल्याची माहीती एका अधिकाऱ्याने टाईम्स बोलताना सांगितले.

कोल्हापूर, नागपूर आणि संभाजीनगरात उच्चांक

मुंबई, ठाणे पुणे आणि नाशिक विभागाच्या तुलनेत कोल्हापूर, नागपूर आणि संभाजीनगर ( औरंगाबाद ) विभागातील मद्यविक्रीची टक्केवारी अधिक चांगली असल्याचे अबकारी शुल्क विभागाच्या खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूर विभागाचा महसूल 42.9 टक्के, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील महसूल अनुक्रमे 29.7 टक्के आणि 28.5 टक्के विक्रीत वाढ झाली आहे.

मुंबई नाशिक पुण्यात तुलनेत खप कमी

मुंबई-ठाणे, पुणे आणि नाशिक विभागातील अबकारी शुल्कात 23 टक्के वाढ झाली आहे. राज्य सरकारने जर बियरवरील कर कमी केला तर मुंबई-ठाणे, नाशिक आणि पुणे विभागातील मद्यविक्रीत देखील मोठी वाढ होईल असे सुमित चावला यांनी सांगितले.

लिबरल पॉलिसीमुळे खपात वाढ

राज्य सरकारच्या लिबरल पॉलिसीमुळे बियर आणि वाईनच्या विक्रीत नागपूर आणि कोल्हापूर तसेच संभाजीनगरात बियर तसेच वाईनच्या पुरवठ्यात वाढ झाली त्यामुळे त्यांच्या खपात आणि महसूलात वाढ झाल्याचे असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिक्वर वेंडर (APRLV ) संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट सुमित चावला यांनी सांगितले.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.