Ratan Tata : 2 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात, मोबाईल पण नाही वापरत, कोण आहेत जिमी नवल टाटा
Ratan Tata : टाटा समूह आणि टाटा कुटुंबियांच्या साधेपणाने तर अनेकांची मनं जिंकली आहे. रतन टाटा यांच्याविषयी तर तरुणाईला मोठा अभिमान आहे. टाटा कुटुंबांचे अजून एक सदस्य जिम्मी नवल टाटा यांच्या साधेपणाची ही गोष्ट
नवी दिल्ली : रतन टाटा (Ratan Tata) यांचे नाव कोणाला माहिती नाही? त्यांच्या साधेपणाने अनेकांची मनं जिंकली आहे. टाटा समूह हा भारतातील जूना आणि श्रीमंत उद्योग समूह आहे. त्याला रतन टाटा यांनी अजून उच्चांकावर पोहचवले आहे. सध्या ते टाटा समूहाचे (Tata Group) चेअरमन आहेत. सोशल मीडियावर त्यांचे मोठे फॅन फॉलोवर्स आहेत. देशात अनेक जण असे आहेत की, त्यांना त्यांच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे असते. त्यांच्या सोशल अकाऊंट्सवर तर त्यांच्या गुणांपेक्षा श्रीमंतीचा दर्प येतो. आलिशान जीवनशैलीचे प्रदर्शन सुरु असते. पण टाटा कुटुंबिय त्याला पूर्वीपासूनच अपवाद आहेत. टाटा कुटुंबांचे अजून एक सदस्य जिम्मी नवल टाटा (Jimmy Naval Tata) यांच्या साधेपणा ही चर्चेत आहे, कोण आहेत हे टाटा?
रतन टाटा यांचे भाऊ केवळ रतन टाटाच नाही तर टाटा कुटुंबियांना साधेपणा भावतो. रतन टाटा यांचे लहान बंधू जिम्मी नवल टाटा हे पण साधेपणात एक नंबर आहेत. ते नेहमीच लाईमलाईटपासून, दिखाव्यापासून चार हात दूर राहतात. मोठे बंधू रतन टाटा यांच्यासारखेच त्यांना ही साधेपणाच आवडतो. 10 हजार कोटींपेक्षा त्यांची संपत्ती अधिक असून ही ते साधेपणाने आयुष्य घालवत आहेत.
मुंबईतील कुलाब्यात छोटे घर काही महिन्यांपूर्वी उद्योगपती हर्ष गोयनका (Harsh Goenka) यांनी ट्विटरवर रतन टाटा यांचे लहान बंधू जिम्मी टाटा विषयी माहिती शेअर केली होती. जिम्मी टाटा सध्या मुंबईत राहतात. कुलाब्यातील टू बीएचके फ्लॅटमध्ये ते राहतात. जिम्मी टाटा हे स्क्वॅशचे चाहतेच नाही तर एक जोरदार खेळाडू आहेत.
सर्वसाधारण आयुष्य जिम्मी टाटा केवळ टू बीएचके अपार्टमेंटमध्येच राहत नाहीत तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नाही. त्यांच्या घरात अत्याधुनिक कोणते ही इलेक्ट्रॉनिक गॅझेट नाही. त्यांच्याकडे अनेक वृत्तपत्र येतात, जगाशी यामाध्यमातून ते जोडलेले आहेत. त्यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे. एखाद्या साध्या भारतीय कुटुंबातील सदस्यांप्रमाणे ते साधे आयुष्य जगत आहेत.
या कंपन्यांमध्ये शेअर होल्डर जिम्मी टाटा यांच्याकडे संपत्ती नाही, असे नाही. ते ठरवून असे साधे जीवन जगत आहेत. ते अब्जावधी रुपयांचे मालक आहेत. त्यांना वारसाहक्काने मोठी संपत्ती मिळाली आहे. त्यांच्याकडे टाटा समूहातील टाटा मोटर्स (Tata Motors), टाटा स्टील (Tata Steel), टाटा सन्स (Tata Sons), टीसीएस (TCS), टाटा पॉवर (Tata Power), इंडियन होटल्स (Indian Hotels) आणि टाटा केमिकल्स (Tata Chemicals) अशा कंपन्यांचे अनेक शेअर्स आहेत.
इतकी आहे संपत्ती जिम्मी टाटा हे टाटा ट्रस्टचे (Tata Trust) संचालक आहेत. टाटा कंपन्यांमधील उलाढालीवर, अनेक अपडेट्सवर त्यांचे लक्ष असते. एका अंदाजानुसार, जिम्मी टाटा यांची एकूण संपत्ती (Jimmy Tata Networth) 10 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांना या कंपन्यांकडून मोठा फायदा मिळतो.त्यांच्याकडे लाखोंचे शेअर्स असल्याने त्यांना मोठा लाभांश मिळतो.