अब की बार 400 पारचा नारा; भाजपच्या कमी जागा आल्यास बाजार कोसळणार?

Share Market Crash : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 जागांचा नगारा वाजवला. भाजप सहज 400 पार जाईल असे त्यांनी जाहीर सभांमधून सांगितले आहे. पण जर भाजप 272 जागांवर विजयी झाली तर मग शेअर बाजार काय प्रतिक्रिया देईल? बाजार कोसळणार का?

अब की बार 400 पारचा नारा; भाजपच्या कमी जागा आल्यास बाजार कोसळणार?
काय बाजार कोसळणार?
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 2:20 PM

लोकसभा निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात आहे. दोन टप्प्यातील मतदानानंतर निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा असेल. 4 जून रोजी मतदारांनी कोणाच्या पारड्यात मतदान टाकले हे स्पष्ट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी 400 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. अनेक जाहीर सभांमधून त्यांनी ‘अब की बार 400 पारचा’ नारा दिला. लोकसभा निवडणुकीच्या विविध टप्प्यात शेअर बाजारात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. चढउताराचे सत्र दिसून आले. आज निफ्टी सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. तर सेन्सेक्सने 75 हजारांची भरारी घेतली. पण अवघ्या काही दिवसांपूर्वी बाजाराने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चूना लावला होता.

निवडणुकीचा अंदाज काय

अनेक राजकीय तज्ज्ञ, बाजारातील तज्ज्ञ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा सत्ता स्थानी असेल असा अंदाज वर्तवत आहेत. भाजप एनडीएचे नेतृत्व करतो. नरेंद्र मोदी यांच्या बाजूने अनेकांनी कल दिला आहे. भाजपने पण यंदा 400 जागांचा नारा दिला आहे. पण विपरीत परिस्थिती आल्यास काय होणार? त्याचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

हे सुद्धा वाचा

NDA 272 वर अडकले तर?

अंदाजापेक्षा विपरीत काही घडलं तर? बिझनेस स्टँण्डर्डने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. त्यानुसार NDA 272 जागांवर अडकल्यास काय होईल? या प्रश्नावर त्यांनी तज्ज्ञ व्यक्ती, संस्थांना बोलते केले. Bernstein यांच्या विश्लेषणानुसार भाजप जर 272 जागांवर थांबले तर बाजार मोठा फायदा बुक करेल. कितीही वाईट परिस्थिती असू, कमी परतावा मिळण्याचा अंदाज बांधू द्या, बाजार अशीच प्रतिक्रिया देईल.

धोरणांचा करावा लागेल पूनर्विचार

नवीन सरकारला अशा परिस्थितीत धोरणांचा पूनर्विचार करावा लागणार आहे. व्यवसायातील भावनिक धोरणाला आवर घालावी लागेल. कर सवलत वाढवावी लागेल. गरीबांसाठी सबसिडीची तरतूद करावी लागेल. तर श्रीमंत आणि कोर्पोरेटवरती कर वाढवावा लागणार असल्याचे Bernstein ने स्पष्ट केले. सरकारला पगारापोटी अधिक खर्च करावा लागेल. मनरेगावर अधिक खर्च अपेक्षित आहे. यासर्वांमुळे वित्तीय तूट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वित्तीय तूट 5.2 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

सरकार समाजाभिमुख

नवीन सरकारला समाजाभिमुख धोरणावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. भारतात पायाभूत सुविधा विकास आणि वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. नवीन सरकार समाजाच्या फायद्याच्या योजनांवर भर देईल, असा दावा Bernstein Private Wealth Management संस्थेने केला आहे. या संस्थेने भारतातील महागाईचा आलेख पुन्हा उंचावण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यानुसार महागाई 6 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. एकदा का निवडणुकांचे निकाल आले की, शेअर बाजार जलद नफा नोंदवेल, असा संस्थेचा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....