Stock Market : 4 जून रोजी काय होईल? केंद्रात नाही आले मोदी सरकार तर शेअर बाजाराचे काय होणार, तज्ज्ञांनी व्यक्त केली ही भीती

Stock Market : लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होईल. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. शेअर बाजारात या निकालाचे तात्काळ परिणाम दिसेल. मोदी सत्तेत परत नाही तर शेअर बाजारात काय होईल, याविषयी तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे.

Stock Market : 4 जून रोजी काय होईल? केंद्रात नाही आले मोदी सरकार तर शेअर बाजाराचे काय होणार, तज्ज्ञांनी व्यक्त केली ही भीती
शेअर बाजारावर काय होणार परिणाम
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 1:45 PM

लोकसभा निवडणूक 2024 आता अखेरच्या टप्प्यात आहे. 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया होईल. तर 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. देशात कुणाला बहुमत मिळाले हे स्पष्ट होईल. अनेक विश्लेषक भाजप तिसऱ्यांदा सत्तेत परत येण्याचा अंदाज वर्तवित आहे. पण मोदी सरकारला बहुमत मिळाले नाही, NDA ला सरकार स्थापन करता आली नाही तर शेअर बाजार काय प्रतिक्रिया देईल? याविषयीचा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बाजार 20 टक्क्यांनी आपटणार

कोटक अल्टरनेट ॲसेट मॅनेजरचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार जितेंद्र गोहिल यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांच्या मते, मोदी सत्तेत परत आले नाही. एनडीएला सरकार स्थापन करता आले नाही तर शेअर बाजार तात्काळ प्रतिक्रिया देईल. शेअर बाजारात 20 टक्क्यांची घसरण होईल आणि नंतर पुढे बाजार सावरायला बराच कालावधी लागेल. पण असे काही होण्याची शक्यता कमी आहे. गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत वैविध्य आणणे आणि निवडणूक निकालापूर्वी जोखीम समजून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एक्झिट पोल ठरवतील बाजाराची दिशा

3 जून रोजी एक्झिट पोलपूर्वी गोहिल यांनी सांगितले की त्यांच्या गुंतवणूक समितीने एक स्थिर धोरण आखले आहे. आमच्या मते, एनडीएचे सरकार देशात पुन्हा येईल. भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. निवडणूक 1 जून रोजी संपेल. तर 3 जून रोजी एक्झिट पोल बाजाराची दिशा ठरवतील. गुंतवणूकदार देशात एक स्थिर आणि गुंतवणूक धोरणाविषयी ठाम भूमिका घेणाऱ्या सरकारच्या पाठीमागे आहे. त्यामुळे भाजपचे सरकार बहुमताने येईल. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारात दिसेल, असे गोहिल म्हणाले.

कोणत्या सेक्टरमध्ये मोठी पडझड

गोहिल यांच्या मते, जर भाजपला सत्ता स्थापन करण्याइतपत बहुमत मिळाले नाही तर PSU, कॅपिटल गुड्स, इन्फ्रा, डिफेंस संबंधित शेअरमध्ये मोठी पडझड दिसून येईल. तर आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रात तेजीचे सत्र असू शकते. त्यांचे मते दहा वर्षांत ज्या सुधारणा झाल्या. त्यात हस्तक्षेप करता येणार नाही.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.