लोकसभा निवडणुकीत हे शेअर ठरतील भाग्यविधाते; कमाईचा मौका सोडू नका

Lok Sabha Election 2024 ची रणधुमाळी सुरु आहे. या कालावधीत शेअर बाजारावर पण त्याचा परिणाम दिसून येईल. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये रॅली येण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या काळात प्रचाराची धार तीव्र होईल. इकडे शेअर पण तेजीत असतील.

लोकसभा निवडणुकीत हे शेअर ठरतील भाग्यविधाते; कमाईचा मौका सोडू नका
लोकसभा निवडणूक काळात व्हा मालामाल
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 11:03 AM

Share Market : लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होईल. तर 4 जून रोजी मतदान मोजणी होईल. इनटेलसेन्स कॅपिटलचे संस्थापक आणि मुख्य इक्विटी सल्लागार अभिषेक वासू मलिक यांनी या काळात स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर गगनाला पोहचतील, असा अंदाज वर्तवला आहे. मलिक यांच्यानुसार, रसायन आणि विमा क्षेत्रात (Chemical & Insurance) रॅली येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेअर बाजारात हे स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

केमिकल-इन्शुरन्स सेक्टर ठरणार उजवे

मलिक यांच्या दाव्यानुसार, पुढील 12 महिन्यात रसायन आणि विमा क्षेत्रातील शेअर्सला अच्छे दिन येतील. हे शेअर सूसाट धावतील. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जोरदार तेजीचे सत्र असेल. पण त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक कायम ठेवावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कालावधीत स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअरमध्ये पुन्हा एकदा उसळी येण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. निवडणुकीच्या काळात या क्षेत्रातील शेअर नवीन रेकॉर्ड करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

मिड कॅप शेअरमधून कमाई

मलिक यांच्या दाव्यानुसार, निवडणूक पूर्व प्रचार काळात स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर पुन्हा शानदार कामगिरी दाखवतील. ते नवीन उच्चांक गाठतील. येत्या काही महिन्यात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमधून गुंतवणूकदारांना चांगली कमाई होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी सध्या निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याचा त्यांचा अंदाज आहे.

PSU Sector साठी ही रणनीती

अभिषेक बसू मलिक यांच्या म्हणण्यानुसार, पीएसयु शेअरला, सार्वजनिक उपक्रमातील शेअरला वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज नाही. या क्षेत्रातील कंपन्या, त्यांचे कामकाज आणि नफा याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे. या क्षेत्रातील प्रत्येक कंपनी जोरदार आहे. प्रत्यके कंपनीची उत्पादन, कामकाज, नफा हे विषय वेगळे आहेत. रेल्वे कंपन्या आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे कामकाज, नफा हे वेगळे विषय आहेत. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करताना सेक्टर आधारे निवड करणे आणि गुंतवणूक करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.