निकाल लागताच भारतातील दोन बड्या अब्जाधीशांना मोठा धक्का; सेन्सेक्स प्रमाणे संपत्तीही घटली

Gautam Adani - Mukesh Ambani Networth : लोकसभा निकालाचे पडसाद सर्वच क्षेत्रावर पडले. व्यापार जगतावर त्याचा लागलीच परिणाम दिसला. शेअर बाजार धाडमधूम आपटला. त्याचा फटका अदानी-अंबानी या दिग्गज उद्योगपतींना पण बसला.

निकाल लागताच भारतातील दोन बड्या अब्जाधीशांना मोठा धक्का; सेन्सेक्स प्रमाणे संपत्तीही घटली
संपत्तीत मोठी घसरण
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 11:52 AM

देशातीलच नाही तर आशियातील दोन श्रीमंत उद्योगपतींना लोकसभा निकालाचा मोठा फटका बसला. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यासाठी मंगळवार हा घात वार ठरला. आकडेवारीनुसार, या दोघांना संयुक्तपणे 2.82 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात मोठा खड्डा पडला. त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

हिंडनबर्गपेक्षा मोठा फटका

हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहत त्सुनामी आली होती. बाजारात त्यांचे शेअर पत्त्यासारखे कोसळले होते. अदानी यांच्या नेटवर्थमध्ये जवळपास 25 दशलक्ष डॉलर संपत्ती स्वाहा झाली. या घसरणीच्या कारणामुळे अदानी श्रीमंतांच्या यादीत घसरुन खाली आले. तर दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास 9 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली.

हे सुद्धा वाचा

अदानी यांच्या संपत्तीत घसरणीचा रेकॉर्ड

गौतम अदानी यांनी नुकतेच मुकेश अंबानी यांना संपत्तीत मागे टाकले होते. ते आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक ठरले होते. मंगळवारी त्यांना मोठा झटका बसला. त्यांच्या शेअरमध्ये जवळपास 6 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याचा थेट परिणाम अदानी यांच्या नेटवर्थवर दिसून आला. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, अदानी यांच्या संपत्तीत जवळपास 25 अब्ज डॉलर म्हणजे 2 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. इतके नुकसान हिंडनबर्गच्या अहवालावेळी सुद्धा झाले नव्हते.

अदानी यांची नेटवर्थ किती?

ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, संपत्तीत घसरणीमुळे अदानी यांची नेटवर्थ 97.5 अब्ज डॉलरने घसरली. तर एका दिवसांपूर्वी त्यांच्या संपत्तीचा आकडा 122 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होता. अदानी यांची इतकी संपत्ती जानेवारी 2023 च्या अखेरीस दिसली होती. मंगळवारी अदानी यांची संपत्ती एकदम घसरुन खाली आली. आत अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक राहिले नाहीत. त्यांना ग्लोबल रिच लिस्टमध्ये पण झटका बसला. Bloomberg Billionaire Index नुसार, ते आता जगातील 11 वे नाही तर 15 वे श्रीमंत उद्योगपती ठरले आहेत. यादीत चार स्थानांची घसरण झाली आहे.

अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत पण मोठी घसरण झाली. आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास 9 अब्ज डॉलर म्हणजे म्हणजे 75 हजार कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांची संपत्ती 106 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. वार्षिक आधारावर अजून पण त्यांचा फायदा दिसत आहे. त्यांच्या संपत्तीत 10 अब्ज डॉलरची वाढ दिसून आली. ते आता पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले आहेत.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.