Desi Juggad | झोमॅटो बॉयचा देशी जुगाड, अशी केली फूड डिलिव्हरी, झाला व्हायरल
Desi Juggad Viral Video | देशभरात हिट अँड रन प्रकरणात वाहतूकदारांनी संप पुकारल्याचा मोठा परिणाम दिसून आला. त्याचे पडसाद सर्वच क्षेत्रावर झाले. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने कोणाला वेळेवर शाळेत, कामावर जाता आले नाही. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने फूड डिलिव्हरीसाठी अशी शक्कल लढवली..
नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2024 : देशभरात हिट अँड रन प्रकरणात वाहतूकदारांनी चक्काजाम केला होता. त्यामुळे इंधन, भाजीपाला आणि दळणवळणाच्या अडचणी उद्भवल्या. काहींना वेळेवर शाळेत जाता आले नाही तर काहींना ऑफिसमध्ये जाण्यास अडचणी आल्या. पेट्रोलपंपावरील ठणठणाटामुळे मोठा फटका बसला. फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना पण ही समस्या उद्भवली. एका डिलिव्हरी बॉयने डिलिव्हरीसाठी एक शक्कल लढवली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची जोरदार चर्चा झाली.
अशी केली डिलिव्हरी
हैदराबादमधील चंचलगुडा परिसरातील एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयला पण पेट्रोलपंप बंदचा फटका बसला. इंधन नसल्याने शहरातील पेट्रोल पंप बंद होते. तर काही ठिकाणी पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. अशावेळी ऑर्डर वेळेत पोहचण्यासाठी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने एक जोरदार जुगाड केले. त्याने घोड्यावर रपेट मारत फूड डिलिव्हरी केली. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. डिलिव्हरी बॉय त्याच्या झोमॅटो लाल बॅगेसह घोड्यावर बसलेला दिसतो. घोड्यावरुन तो फूड डिलिव्हरीसाठी बाहेर पडल्याचे दिसते. पेट्रोल संपल्यावर त्याने ही भन्नाट आयडिया लढवली.
जुनी आठवण ताजी
पेट्रोल संपल्यानंतर अथवा काही पेट्रोल पंप बंद असल्याने झोमॅटोच्या बॉयने हा देशी जुगाड केला. यापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना ऑर्डर पोहचत करण्यासाठी एका स्विगीच्या डिलिव्हरी एजंटने पण असाच जुगाड केला होता. त्याने घोड्यावरुन आवडीचे खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहचवले होते. त्याची आठवण हा व्हिडिओ पाहताना अनेकांना आली.
When petrol bunks ran out of fuel in #Hyderabad, @zomato delivery arrived on horseback … at Chanchalguda, next to Imperial Hotel… after long, long queues & closure of petrol pumps as a fallout of #TruckersStrike over #NewLaw on hit-and-run accidents @ndtv @ndtvindia pic.twitter.com/bYLT5BuvQh
— Uma Sudhir (@umasudhir) January 3, 2024
ट्रकचालकांनी केला होता चक्काजाम
देशभरात ट्रकचालकांनी केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात चक्काजाम आंदोलन केले होते. त्यामुळे दोनच दिवसात महानगरच नाही तर अनेक शहरात इंधनाचा, दुधाचा, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने वाहतूकदारांच्या संघटनांशी बोलणी केली आणि सध्या तात्पुरता तोडगा काढला. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @umasudhir युझरने एक्स (ट्विटर) वर पोस्ट केला आहे. थोड्याच वेळात तो व्हायरल झाला.