एटीएम कार्ड हरवलंय? मग त्वरीत करा हे काम, पैसे काढण्याचा धोका नाही

जर आपण इंटरनेट बँकिंग(Internet Banking)ची सुविधा घेतली असेल तर या मदतीने आपण त्वरीत आपले कार्ड ब्लॉक करू शकता. (Lost ATM card, Then do it quickly, there is no risk of withdrawing money)

एटीएम कार्ड हरवलंय? मग त्वरीत करा हे काम, पैसे काढण्याचा धोका नाही
एटीएम कार्ड हरवलंय? मग त्वरीत करा हे काम
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 2:53 PM

नवी दिल्ली : आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्वजण एटीएम कार्ड वापरतो. याद्वारे पैसे काढणे सोपे झाले आहे, परंतु एटीएम कार्ड हरवले तर लोकांच्या हृदयाची धडधड वाढते. कारण एटीएममधून पैसे जाण्याची भीती असते. जर आपले एटीएम चुकीच्या हातात गेले तर ते त्याचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे एटीएम कार्डचा गैरवापर होऊ नये यासाठी आपण त्वरीत कारवाईची पावले उचलल्यास आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा गैरवापर रोखू शकतो. (Lost ATM card, Then do it quickly, there is no risk of withdrawing money)

Internet Banking ची मदत घ्या

जर आपण इंटरनेट बँकिंग(Internet Banking)ची सुविधा घेतली असेल तर या मदतीने आपण त्वरीत आपले कार्ड ब्लॉक करू शकता. यासाठी प्रथम आपण इंटरनेट बँकिंग वर जा आणि लॉगिन करा. यानंतर, डेबिट कार्ड पर्यायावर जा. येथे आपण आपला डेबिट कार्ड नंबर निवडा जो हरवला किंवा गमावला आहे. त्यानंतर, आपले डेबिट कार्ड ब्लॉक करा(Block your Debit Card) या पर्यायावर क्लिक करून आपले कार्ड ब्लॉक करा. आता आपल्या कार्डमधून कोणीही पैसे काढू शकणार नाही.

मोबाईल बँकिंग अ‍ॅपने बंद करा एटीएम

मोबाईल बँकिंग अ‍ॅपच्या मदतीने आपण आपले कार्ड ब्लॉक देखील करू शकता. यासाठी तुम्हाला संबंधित मोबाईलमध्ये संबंधित एटीएम कार्डच्या बँकेचे अ‍ॅप उघडावे लागेल. आता तुम्हाला कार्ड ऑप्शनवर जा आणि तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. हे कार्ड ब्लॉक करेल.

हेल्पलाईन नंबरवर कॉल करा

आपण बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपले एटीएम कार्ड देखील ब्लॉक करू शकता. यावेळी, आपल्याला आपला एटीएम आणि बँक खाते क्रमांक सांगावा लागेल. यावेळी, आपल्याला काही माहिती शेअर करावी लागेल, जसे की आपण शेवटचा व्यवहार कधी केला, आपण किती रुपयांचा व्यवहार केला इ. गोष्टींचे व्हेरीफिकेशन केल्यानंतर, आपले कार्ड ब्लॉक केले जाईल.

एफआयआर करायला विसरू नका

जर आपल्याला असे वाटत असेल की आपले एटीएम कार्ड चोरीला गेले आहे, तर याबाबत त्वरीत एफआयआर(FIR) नोंदवावा. यासाठी तुम्हाला जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये कार्ड चोरीचा अहवाल द्यावा लागेल. एफआयआर नोंदविल्यानंतर त्याची एक प्रत तुम्हाला दिली जाईल. ही प्रत भविष्यात वापरासाठी जपून ठेवावी. (Lost ATM card, Then do it quickly, there is no risk of withdrawing money)

इतर बातम्या

फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, पण आता उतावीळपणे चुकीचं पावलं टाकली, माजी IPS ने कान टोचले

Corona Cases and Lockdown News LIVE : परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे कोरोनामुळे निधन

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.