प्रवासादरम्यान तिकीट हरवले? चिंता करू नका; ‘असे’ मिळवा डुप्लीकेट तिकीट

प्रवासादरम्यान तिकीट हरवल्यास आपल्याला पकडले जाण्याची भीती वाटते. पकडल्यास दंड देखील होतो. मात्र 'या' गोष्टी माहित असल्यास आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही.

प्रवासादरम्यान तिकीट हरवले? चिंता करू नका; 'असे' मिळवा डुप्लीकेट तिकीट
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 12:06 PM

नवी दिल्ली – दररोज  लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. काही लोक एकटे प्रवास करतात, तर काही आपल्या परिवारासोबत. अनेकवेळा घाई गडबडीध्ये आपण आपले तिकीट घरी विसरतो किंवा ते आपल्याकडून हरवते. अशा वेळेस आपल्यावर विनातिकीट प्रवास करण्याची पाळी येते. विनातिकीट प्रवास करताना आपण पकडले तर जाणार नाहीना? अशी भिती सतत आपल्या मनामध्ये असते. विनातिकीट पकडल्यास दंड देखील वसूल केला जातो. मात्र आता जर तुम्ही तुमचे तिकिट घरी विसरले असाल तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त पुढील सोप्या पद्धती अंमलात आणा.

टीसीला तिकिट हरवल्याची माहिती द्या

तुम्ही तुमचे तिकीट घरी विसरला असाल, कींवा हरवले असेल तर तुम्ही अशावेळेला तातडीने टीसीशी संपर्क साधा. त्याला सर्व माहिती द्या. तुम्ही ऑनलाईन तिकीट काढताना जी माहिती भरली होती, त्यातील काही माहिती देऊन तुम्ही परत तिकीट मिळू शकता. अथवा तशी सुविधा नसेल तर फक्त 50 रुपयांचा दंड भरून तुम्ही टीसीकडून दुसरे तिकीट घेऊ शकता.

चार्ट तयार होण्यापूर्वी घ्या डुप्लीकेट तिकीट

हे सर्व काम तुम्हाला रेल्वेचा प्रवासी चार्ट तयार होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. चार्ट बनल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या कन्फर्म तिकीटाची डुप्लीकेट कॉपी हवी असेल तर तिकिटाच्या निम्मी किंमत तुमच्याकडून वसूल केली जाई. मात्र चार्ट तयार होण्यापूर्वी तुम्ही टीसीशी संपर्क साधल्यास तुम्हाला केवळ 50 रुपयांमध्ये डुप्लीकेट तिकीट मिळू शकते. रेल्वेच्या इतर क्लाससाठी ही रक्कम 100 एवढी असते. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल किंवा तुमच्या तिकिटाचे स्टेटस हे आरसी असेल तर तुम्हाला डुप्लीकेट तिकीट मिळणार नाही. जर तुमचे ओरिजिनल  तिकीट प्रवासादरम्यान तुम्हाला पुन्हा सापडले, तर तुम्ही प्रवास संपण्याच्या आधी ओरिजिनल आणि डुप्लीकेट  असे दोन्ही तिकीटे टीसीला दाखवून दंडाची रक्कम परत मिळू शकता. त्यामुळे आता तिकिट हरवल्यास चिंता करण्याचे कारण नाही.

संबंधित बातम्या 

एसबीआयकडून 2 लाखांचा मोफत फायदा; ‘हे’ ग्राहक असणार लाभार्थी

व्यवसायिकांचे क्रिप्टोकरन्सीला प्राधान्य; सोन्यातील गुंतवणुकीत घट, काय आहेत कारणे?

Paytm ने शेअर विक्रीत इतिहास रचला, 18300 कोटी रुपयांचा IPO पूर्ण सबस्क्राईब झाला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.