Gold Silver Rate Today : सोने खरेदीदारांची चांदी, 10 ग्रॅमच्या किंमती इतक्या आल्या खाली

Gold Silver Rate Today : भारतीय सराफा बाजाराने खरेदीदारांना आनंदवार्ता दिली आहे. सोन्यात घसरण झाली. त्यामुळे खरेदीची सुवर्णसंधी चालून आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Rate Today : सोने खरेदीदारांची चांदी, 10 ग्रॅमच्या किंमती इतक्या आल्या खाली
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 9:28 AM

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या आघाडीवर मोठा दिलासा आहे. खासकरुन मे-जून महिन्यात किंमती घसरणीवर आहेत. सोने 60,000 रुपयांच्या आत आल्याने खरेदीदारांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र आहे. त्यातच चांदीत ही गेल्या दोन महिन्यात मोठी घसरण झाली आहे. चांदीत मध्यंतरी तीन हजारांची घसरण झाली होती. त्यानंतर भाव 1500 रुपयांनी वधारले होते. या घसरणीचा ग्राहकांना फायदा उठवता येईल. त्यांना सोने-चांदीत गुंतवणुकीची चांगली संधी आहे. 8 जुलै 2023 रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold & Silver Price Update) सकाळच्या सत्रात घसरण दिसली. सोन्याचा भाव 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 69000 रुपये प्रति किलो झाली. अमेरिकन बाजारातील घडामोडींमुळे सोने-चांदीच्या किंमतीत अजून घसरणीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

व्याजदर महागणार महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने-चांदी दबावाखाली येण्याची शक्यता आहे. डॉलर (Dollar) अजून मजबूत करण्यासाठी फेडरल रिझर्व्हची कवायत सुरु झाली आहे. त्याचा परिणाम सोने-चांदीवर दिसून येऊ शकतो. किंमती घसरु शकतात.

तीनदा वाढ, दोनदा घसरण जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याने उसळी घेतली होती. 6 जुलै रोजी सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली. तर 4 जुलै रोजी भाव 100 रुपयांनी वधारले होते. 1 जुलै रोजी सोन्याने 220 रुपयांची उसळी घेतली होती. 3 जून रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली होती. तर 7 जुलै रोजी किंमती 100 रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या. आज सकाळच्या सत्रात अजून किंमती अपडेट झाल्या नाहीत. गुडरिटर्न्सनुसार, 7 जुलै रोजी 22 कॅरेट सोने 54,300 रुपये तर 24 कॅरेट सोने 59,220 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

हे सुद्धा वाचा

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव 6 जुलै रोजी सोन्यात किंचित वाढ दिसून आली. 24 कॅरेट सोने 58,586 रुपये, 23 कॅरेट 58,351 रुपये, 22 कॅरेट सोने 53,665 रुपये, 18 कॅरेट 43940 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34273 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.

किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...