Bank FD Rates | गुंतवणूकदार मालामाल, या बँकांनी मुदत ठेवीवर वाढवले व्याज

Bank FD Rates | बँकांनी ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय काही बँकांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकांनी ग्राहकांना मुदत ठेवीवर जादा व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना बँकेतूनही कमाईची संधी मिळाली आहे.

Bank FD Rates | गुंतवणूकदार मालामाल, या बँकांनी मुदत ठेवीवर वाढवले व्याज
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 11:15 AM

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : देशातील काही बँकांनी मुदत ठेवीवर ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून काही बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे नवीन वर्षांत बँकांमध्ये मुदत ठेव करणाऱ्या ठेवीदारांना अधिक कमाई होईल. त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांना अधिक परतावा मिळेल. कोरोना काळात व्याजदरात कपात झाली होती. आता ग्राहकांना वाढीव व्याजदराचा फायदा होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दर स्थिर ठेवला आहे. हा रेपो रेट 6.5 टक्के आहे. तरीही FD वरील व्याजदरात बँकांनी वाढ केली आहे. SBI सह देशातील 7 मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ केली. काही बँकांचे एफडीवरील व्याजदर 8-9 टक्क्यांवर पोहचला आहे.

भारतीय स्टेट बँक (SBI FD Rates)

भारतीय स्टेट बँकेने मुदत ठेववरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन वर्षांचे ग्राहकांना गिफ्ट दिले आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी एफडीवरील व्याज दरात 50 बेसिस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

हे सुद्धा वाचा
  • 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.50 ते 7 टक्के व्याज
  • नवीन व्याजदर हा 2 कोटी रुपायंपेक्षा कमी एफडींसाठी आहे
  • बँकेने खास अमृत कलश एफडीला मुदत वाढ दिली आहे
  • 31 मार्च 2024 पर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येईल
  • 400 दिवसांच्या योजनेत 7.10 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda FD Rates)

  • कमी कालावधीच्या मुदत ठेवीवर 1.25 टक्क्यांची वाढ
  • बँकेने 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 3 टक्क्यांहून 4.25 टक्क्यांपर्यंत व्याज वाढवले
  • 15 ते 45 दिवसांच्या एफडीवर व्याजदरात 1 टक्के वाढ केली. ते 4.5 टक्के झाले

एक्सिस बँक (Axis Bank FD Rates)

  • बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल केला
  • नवीन व्याजदर 26 डिसेंबर 2023 रोजीपासून लागू झाले आहे
  • या नवीन बदलामुळे बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 3 ते 7.10 व्याज देत आहे

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India FD Rates)

  • बँकेने विविध कालावधीच्या एफडीवर 0.25 टक्क्यांची वाढ केली
  • 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीतील एफडीवर 3 ते 7.25 टक्के व्याज
  • 399 दिवसांच्या मुदत ठेवीवर सर्वाधिक 7.25 टक्के व्याज
  • ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा अधिक व्याजदर मिळेल

डीसीबी बँक (DCB Bank FD Rates)

  • खासगी क्षेत्रातील DCB बँकेने नुकतीच मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे
  • 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.75 ते 8 टक्क्यांपर्यंत व्याज
  • ज्येष्ठ नागरिकांना 4.25 ते 8.60 टक्के रिटर्न मिळेल
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.