LPG gas cylinder new rates: महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासा, एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल मार्केटिंग कंपनीकडून (OMCs) एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर (LPG Gas Cylinder Price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे.

LPG gas cylinder new rates: महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासा, एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर
गॅस सिलिंडरचे नवे दर Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 7:57 AM

मुंबई : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल मार्केटिंग कंपनीकडून (OMCs) एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर (LPG Gas Cylinder Price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार 19 किलोग्रॅम व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 136 रुपयांनी कमी झाले आहेत. आता राजधानी दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलिंडरचा दर 2,354 रुपयांऐवजी 2219 रुपये एवढा झाला आहे. मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात कोणताही बदल करण्यात आला नसून गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली होती. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ सुरू होती. मात्र जूनच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे.

मे महिन्यात दोनदा वाढ

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यवसायिक सिलिंडर 136 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा दरवाढ करण्यात आली होती. सात मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर 19 मे रोजी पुन्हा एकदा 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज घरगुती सिंलिंडरचे दर देखील स्वस्त होतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या चौदा महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 190 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढतच असल्याने गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे.

हे सुद्धा वाचा

हॉटेल व्यवसायिकांना दिलासा

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ सुरूच  होती. गेल्या महिन्यात देखील व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ पहायाला मिळाली होती. व्यवसायिक सिलिंडर तब्बल 250 रुपयांनी महाग झाला होता. व्यवसायिक सिलिंडरमध्ये दरवाढ सुरूच असल्याने त्याचा मोठा फटका हा हॉटेल व्यवसायिकांना बसत होता. मात्र आज व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 136 रुपयांची कपात करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.