व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?

आज एक एप्रिल 2022 चालू आर्थिक वर्षाचा पहिला दिवस, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे (LPG Gas Cylinder) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?
गॅस सिलिंडरचे दर वाढले
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 9:39 AM

आज एक एप्रिल 2022 चालू आर्थिक वर्षाचा पहिला दिवस, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे (LPG Gas Cylinder) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी (OMCs) ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 22 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यवसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. मात्र आज घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा व्यवसायिकांसाठी मोठा झटका मानण्या येत असून, सिलिंडरचे दर वाढल्याने हॉटेलमधील जेवन महाग होण्याची शक्यता आहे.

घरगुती गॅसच्या किमती स्थिर

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत स्थिर ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा  मिळाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये सुधारीत गॅस सिलिंडरच्या दरानुसार घरगुती गॅसची किंमत 949.5 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 976 रुपये प्रति सिलिंडर इतकी आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे आज व्यवसायिक गॅसच्या किमतीमध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली असून, व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 2,205 रुपयांवर पोहोचली आहे. दरवाढीपूर्वी मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत 1,995 इतकी होती. व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एटीएफच्या दरात वाढ

नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीबरोबरच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. विमान इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. विमानाचे इंधन एटीएफचे दर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार एटीएफचे भाव 1,12,925 किलोलीटरवर पोहोचले आहेत. भाववाढीपूर्वी एटीएफचे दर 1,10,666 रुपये किलोलीटर होते. नवे दर येत्या 15 एप्रिल 2022 पर्यंत लागू राहणार आहेत. गेल्या वर्षभरात सातव्यांदा एटीएफच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

विमान प्रवास महागणार? आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा झटका, ATF च्या दरात वाढ

पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याज दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर

Petrol, Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.