Lpg Cylinder Price | बाजार भावापेक्षा स्वसतात मिळतायेत गॅस सिलिंडर, किंमत फक्त इतकीच!

गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही वर्षांपासून कमालीची दरवाढ झाली आहे. यामुळे सर्वसामांन्यांना दरमहिन्याला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

Lpg Cylinder Price | बाजार भावापेक्षा स्वसतात मिळतायेत गॅस सिलिंडर, किंमत फक्त इतकीच!
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 7:18 PM

मुंबई | गॅस कंपनींकडून महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरचे दर जाहीर करण्यात येतात. त्यानुसार 1 मार्चला 2023 गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले. यावेळेस घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये 50 तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 350 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे महागाईने आधीच पिचलेल्या सर्वसामान्यांना गॅसदराचा ‘भडका’ सहन करावा लागला. सातत्याने होणाऱ्या या दरवाढीमुळे सर्वसामन्यांच्या खिशाला ‘आग’ लागली आहे. मात्र तुमच्यासाठी आम्ही दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत.

या दरवाढीनंतर तुम्ही स्वसतात सिलिंडर बूक करु शकता. जर तुम्ही App द्वारे सिलिंडर बूक करत असाल, तर त्यात कॅशबॅक मिळण्याची शक्यता असते. पेटीएमसह अन्य यूपीआय App च्या माध्यमातून सिलिंडर बूक करुन याआधी अनेकांनी कॅशबॅकचा फायदा घेतला आहे. मात्र आता सिलिंजर स्वसतात हवा असेल, तर आणखी एक पर्याय आहे. ग्राहक बजाज फायनान्स App च्या मदतीने गॅस बूक केल्यास फायदा होऊ शकतो.

बजाज फिनसर्व app च्या मदतीने सिलिंडर बूक केल्यास 50 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही प्रोमोकोडचा वापर करायचा नाहीये. तर यासाठी बजाज पे यूपीआय द्वारे पेमेंट करावं लागेल. त्यानंतर तुम्ही कॅशबॅकचा फायदा घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा

मुंबईत 1 मार्चआधी घरगुती सिलिंडरचे दर हे 1 हजार 52 रुपये इतके होते. मात्र 50 रुपयांनी वाढ झाल्याने आता 1 हजार 102 रुपये मोजावे लागणार आहेत. तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तुफान वाढ झाली आहे. मार्चआधी हा सिलिंडर 1 हजार 721 रुपयांना मिळत होता. पण आता या दरात 350 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे व्यावसायिकांना 2 हजार 71 रुपये आणि 50 पैशे मोजावे लागणार आहेत.

गॅस सिलेंडरच्या दराचा चढता आलेख

एप्रिल 2021 पासून आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या किंमतीत 284 रुपयांची वाढ झालेली आहे. एप्रिल 2021 मध्ये गॅस सिलेंडर 809 रुपयांत विक्री होत होते. त्यानंतर आतापर्यंत यामध्ये 9 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत 2021 मध्ये 205.5 रुपयांची वाढ झाली. तर 2022 मध्ये 153.5 रुपयांनी किंमती वाढल्या.

सुरु वर्षात 2023 मध्ये पहिल्यांदा एलपीजी सिलेंडरच्या किंमती 50 रुपयांनी वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 1103 रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.