LPG Insurance : गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर , तुम्हाला नुकसान भरपाई मिळते का? काय असते प्रक्रिया..

LPG Insurance : सिलेंडरचा स्फोट झाला तर नुकसान भरपाई मिळते का?

LPG Insurance : गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर , तुम्हाला नुकसान भरपाई मिळते का? काय असते प्रक्रिया..
विम्याचे संरक्षणImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 9:08 PM

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे घरगुती गॅस कनेक्शन (LPG Gas Connection) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपण रोजच्या स्वंयपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा (Gas Cylinder) वापर करतो. पण अनेकदा कळत-नकळत मोठा अपघात होतो. गॅसचा स्फोट होतो. नको ते घडतं. अशावेळी घरातील व्यक्ती जखमी होते. घराचे नुकसान होते. अशावेळी ऑईल कंपन्या नुकसान भरपाई देतात का? तुम्हाला विमा लागू असतो का?

तर ज्यावेळी तुम्ही घरगुती गॅसचे कनेक्शन करता, त्यावेळी तुमचा विमा काढण्यात आलेला असतो. याला एलपीजी विमा संरक्षण (LPG Insurance Cover) पॉलिसी म्हणतात. तुमची छोटीशी चूक फार मोठं नुकसान करते. अशात तुमचा विमा उतरविला असल्यास केंद्र सरकारकडून 40 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

घरगुती गॅस कनेक्शन देताना पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण देतात. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती होते वा स्फोट झाल्यास नुकसान भरपाई मिळते. ग्राहकाला कंपन्या आर्थिक मदत देतात. या विम्यासाठी पेट्रोलियम कंपन्या विमा कंपन्यांसोबत करार करतात.

हे सुद्धा वाचा

LPG Insurance Cover मध्ये 50 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्यात येते. गॅस सिलेंडरमुळे होणाऱ्या अपघातात जीवितहानी आणि घराचे मोठे नुकसान होते. गॅस कनेक्शनसोबत तुम्हाला 40 लाख रुपयांपर्यंताचा अपघात विमा देण्यात येतो.

या विम्यातंर्गत ग्राहकाला सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात मृत्यू ओढावल्यास, 50 लाख रुपयांपर्यंत दावा दाखल करता येतो. या दुर्घटनेत मालमत्ता अथवा घराचे नुकसान झाल्यास ग्राहकाला 2 लाख रुपयांपर्यतचा दावा करता येतो. यातील नियमानुसार, सिलेंडर ज्याच्या नावावर आहे, त्याला विम्याची रक्कम मिळते. यामध्ये वारस नेमण्याची तरतूद नाही.

जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर घेता, नवीन कनेक्शन घेता, त्यावेळी विम्याचे संरक्षण आहे की नाही, याची शहानिशा करा. गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट आणि इन्शुरन्सची माहिती मिळवा. तसेच गॅस सिलेंडर घेताना तो चेक करुन घ्या.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.