LPG Price Cut | दर कपातीनंतर घरगुती गॅसची किंमत किती? तुमच्या शहरातील भाव येथे करा चेक
LPG Price Cut | लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्याअगोदरच मोदी सरकारने नारी शक्तीला वंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपात केली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आली होती.
नवी दिल्ली | 8 March 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने किचन बजेटमध्ये थोडा दिलासा दिला. जागतिक महिला दिनी, मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात केली. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आली होती. गॅस सिलेंडरच्या किंमती एकूण 300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. जून 2023 मध्ये गॅस सिलेंडर 1100 रुपयांवर पोहचल्या होत्या. गेल्या सात महिन्यांपासून 14.2 किलोच्या सिलेंडरचा भाव 902.50 रुपये होता. गॅस सिलेंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला आहे.
सात महिन्यांपासून नाही दरवाढ
सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच समोर येईल.
काय केले ट्विट
महिला दिवसाचे औचित्य साधत आम्ही एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नारी शक्ती म्हणून महिलांचे आयुष्य सोपे होईल. कोट्यवधी कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होईल. हे पाऊल पर्यावरण सुरक्षेसाठी पण मदतीचे ठरेल. त्यामुळे सर्व कुटुंबांचे आरोग्य चांगले होईल.
महिला दिवस के अवसर पर आज हमने एलपीजी सिलेंडर की कीमतों में 100 रुपये की छूट का बड़ा फैसला किया है। इससे नारी शक्ति का जीवन आसान होने के साथ ही करोड़ों परिवारों का आर्थिक बोझ भी कम होगा। यह कदम पर्यावरण संरक्षण में भी मददगार बनेगा, जिससे पूरे परिवार का स्वास्थ्य भी बेहतर रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
कोणत्या शहरात काय किंमती (Goodreturns Price)
- मुंबईत 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 802 रुपये आहे.
- पुण्यात 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 806 रुपये
- कोल्हापूर शहरात 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 806 रुपये
- नाशिकमध्ये 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 806 रुपये
- छत्रपती संभाजीनगरमध्ये 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसचा भाव 811 रुपये
- अमरावती शहरात 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 836 रुपये
- नांदेडमध्ये 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 828 रुपये
- उपराजधानी नागपूरमध्ये 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसचा भाव 854रुपये
उज्ज्वला सबसिडीला मुदतवाढ
मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलिंडरबाबत पण मोठा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलिंडवरील अनुदान एक वर्षांसाठी वाढविण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेतंर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या कालावधीत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.