LPG Price Cut : ग्राहकांसाठी आनंदवार्ता, एलपीजी सिलेंडर झाले स्वस्त, आता किती मोजावे लागतील दाम

संपूर्ण देशात सध्या निवडणुकीची धामधूम आहे. याच दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर या महिन्यात ताण येणार नाही, इतके मात्र नक्की.

LPG Price Cut : ग्राहकांसाठी आनंदवार्ता, एलपीजी सिलेंडर झाले स्वस्त, आता किती मोजावे लागतील दाम
एलपीजी सिलेंडर झाले स्वस्त
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 9:14 AM

Lok Sabha Election 2024 चे दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. त्यापूर्वीच 1 मे रोजी घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 9 मार्च रोजी सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दाम एप्रिल महिन्यात कमी झाले होते. आता पण असाच काहीसा दिलासा ग्राहकांना देण्यात आला आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात दिलासा

  1. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्यांदा दिलासा मिळाला आहे. अर्थात हा मोठा दिलासा नाही. फुल नाही फुलाची पाकळी मिळाली आहे. देशातील चारही महानगरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण दिसून आली आहे. त्यामुळे हॉटेलिंग थोडेबहुत स्वस्त होणे अपेक्षित आहे.
  2. देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 19 रुपयांची घसरण दिसून आली. त्यामुळे तीन महानगरांमध्ये किंमती क्रमश: 1745.50 रुपये, 1698.50 रुपये आणि 1911 रुपये प्रति गॅस सिलेंडर झाल्या. तर कोलकत्तामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव 20 रुपये प्रति गॅस सिलेंडरने कमी झाला. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किंमती 1859 रुपये झाल्या.
  3. हे सुद्धा वाचा
  4. गेल्या दोन महिन्यांचा विचार करता चार महानगरांमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती जवळपास 50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. दिल्लीत व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 49.5 रुपयांची स्वस्ताई आली आहे. कोलकतामध्ये हा भाव 52 रुपये, मुंबईत दोन महिन्यात 50.5 रुपये तर चेन्नईत व्यावसायिक गॅसच्या किंमती 49.5 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल नाही

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्या महिन्यात कोणताच बदल दिसला नाही. यापूर्वी 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी झाल्या होत्या. तेव्हापासून या किंमती स्थिर आहेत. दबाव असतानाही तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचा भाव वाढवलेला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये, कोलकतामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नईत हा भाव 818.50 रुपये आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.